पोळा - गणेशोत्सव साजरा करतांना नियमांचे काटेकोर पालन करा- उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील -NNL

तालुक्यातील अवैद्य दारू विक्रीबंद करण्यासाठी हद्दपारीची प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना

शहरातील खड्डेमय रस्त्यासह, वीज, मिरवणूक मार्ग यासह अनेक समस्यांवर चर्चा व अधिकाऱ्यांना सूचना


हिमायतनगर, अनिल मादसवार| दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यंदा पोळा - गणेशोत्सव आनंदाने साजरा होणार आहे. आगामी सण साजरा करताना गणेशभक्तानी शासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी केले. ते हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यात दि.२३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमेटीच्या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.


हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या वतीने दि.२३ मंगळवारी दुपारी १२ वाजता आगामी पोळा, गौरी - गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तहसीलदार डी.एन.गायकवाड, मुख्याधिकारी शामकांत जाधव, बांधकाम विभागाचे अभियंता कंधारकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे, पोलीस निरीक्षक बी डी.भुसनर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, नंदलाल चौधरी, यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, सरपंच, विविध पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनर यांनी शासनाकडून सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध केलेल्या शासन नियमांची माहिती देऊन पोळा- गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करून शांततेची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले.   


यावेळी गणेशेत्सव मिरवणुकीतील येणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत आशिष सकवान, रामभाऊ सूर्यवंशी, परमेश्वर गोपतवाड, पवन करेवाड, गजानन चायल, उदय देशपांडे, समद खान, अनिल भोरे, सदाशिव सातव, गजानन हरडपकर, ग्रामीण भागातून आलेल्या अनेक गणेशभक्त नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला अनुसरून बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांनी सांगितले कि, शासनाच्या नियमांचे पालन सर्वानाच करावे लागेल. डीजे वाजविण्याची परवानगी कुनालयी नाही. तरी दोन बॉक्सला तीही सौम्य आवाजासाठी आम्ही परवानगी देत आहोत. सर्व गणेशभक्त मंडळांनी परवानगी घेऊन मूर्तीची स्थापना करावी, मूर्तीच्या सुरक्षेसाठी आणि स्टेज, मंडप व लाईटची परवानगी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या परवानग्या हिमायतनगर पोलीस ठाण्यात एकल खिडकी हि योजना राबवून दिल्या जातील. कुणीही रस्त्यावर अथवा अडथळा निर्माण होईल अश्या प्रकारे मंडप उभारू नये, मूर्तीच्या सुरक्षेसाठी वॊटरप्रूफ़ मंडप उभारावे, जेणेकरून मूर्ती सुरक्षित राहील. यासाठी स्वयंसेवक नेमाने आणि घेण्यात येणारे सामाजिक उपक्रम याबाबतची माहिती मंडळांनी अगोदर पोलिसांना द्यावी. 


पोलीस प्रशासनाने ठरून दिलेल्या मार्गानेच पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जावी. मिरवणूक रस्त्यात येणाऱ्या अडचणी बांधकाम साहित्य बाजूला करून रस्ता मोकळा करून रस्त्यावरील सर्व खड्डे आणि विसर्जन ठिकाणच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना नगरपंचायतीच्य अधिकारी याना देण्यात आल्या. शहरातील व विसर्जन मार्गावरील पथदिवे सुरळीत करून भक्तांची अडचण दूर करावी. महावितरणने विजेची व्यवस्था सुरळीत ठेऊन गणेश भक्तांना अडचण होणार नाही याची खबरदारी घ्यावी. गणेश मंडळांनी उत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांना शिकायला मिळेल असे कार्यक्रम, आणि शासनाचे धोरण दाखविणारे सामाजिक उपक्रमातून संदेश देणारे किंवा आरोग्य व रक्तदान शिबिरे, घेऊन उत्सव साजरा करावा असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ ठाकरे, माजी जी.प.सदस्य समद खान, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, माजी नगराध्यक्ष अब्दुल अखिल, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, कृउबाचे माजी सभापती गजानन तुप्तेवार, जफर लाला, विलास वानखेडे, प्रवीण कोमावार, सय्यद मन्नान, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, पांडुरंग तुप्तेवार, रामू नरवाडे, शेख रहीम पटेल, जनार्धन तांडवाड, कल्याण ठाकूर, योगश चीलकावार, तालुक्यातील पोलीस पाटील, शांतता कमिटीचे सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळाचे व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी व पत्रकार उपस्थित होते. शांतता कमिटीच्या बैठकीचे नियोजन डीएसबीचे श्री कुलकर्णी यांनी केले. याकामी त्यांना ठाण्यातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केलं. शेवटी पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन यांनी बैठकीला उपस्थित झालेल्या सर्वांचे आभार मानले. 

हिमायतनगर तालुक्यातील अनेक भागात अवैध्यरित्या देशी दारूची विक्री केली जात आहे, याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावात भांडण तंटे वाढत असून, किमान पोलिसांनी आपल्या बिट जमादाराना सूचना देऊन तातडीने गावात दारू विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. त्यामुळे पोलीस बंदोबस्त नसला तरी पोळा, गणेशोत्सव शांततेत साजरे होतील अशी मागणी जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील यांचे समक्ष शांतता कमिटीच्या बैठकीत केली.

गेल्या २ महिन्यापासून आम्ही नगरपंचायतीला गणेशोत्सव येत असल्याने ढासळलेली विहीर दुरुस्त करून रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सोडवावी अशी विनंती केली आहे. मात्र नगरपंचायतीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आणखी गणेशोत्सवाला अवधी आहे, या वेळेत विहीर आणि रस्त्यावरील खड्ड्यासह इतर समस्या सुटल्या नाहीतर एकहाती गणपतीचे विसर्जन होणार नाही असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत दिला. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी