नांदेड| जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदी एस. जी. माळोदे आज रुजू झाले आहेत.
अनेक दिवसापासून नांदेड जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त होते. शासनाने धुळे जिल्हा परिषद येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. जी. माळोदे यांची नियुक्ती जिल्हा परिषद नांदेड येथे दिल्याने ते आज नांदेड जिल्हा परिषदेमध्ये रुजू झाले आहेत. माळोदे हे 2003 मध्ये जालना येथे ग्रामविकास प्रशिक्षण केंद्रात प्राचार्य म्हणून पहिली नियुक्ती स्वीकारली.
त्यानंतर 2007 ते 2010 मध्ये नाशिक जिल्ह्यात निफाड येथे गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी कार्य केले. 2010 ते 2013 मध्ये औरंगाबादला उप मुख्य कार्यकारी अधिकारी, 2013 ते 2017 नाशिक येथे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. 2017 ते 2018 या कालावधीत विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे सहाय्यक आयुक्त आणि 2018-19 मध्ये नंदुरबार येथे प्रकल्प संचालक आणि आता धुळे येथून त्यांची नांदेड येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. आज ते रुजू झाले आहेत.