काही साखर कारखान्यांनी उस शिल्लक ठेवून कारखाने बंद केले पण सुभाष शुगर प्रा.लि प्रशानाने तसे केले नाही -NNL


हदगाव, शे चादपाशा|
उस उत्पादक शेतक-याचे नुकसान होऊ नये म्हणुन अखेर पर्यत साखर कारखाना सुरु ठेवला अस हदगाव शहरानजीक श्री सुभाष शुगर प्रा.ली.हडसणीच्या प्रशासनाने म्हटले आहे. प्रशासनाने दि २२ आगष्टला जारी केलेल्या पञकात म्हटले आहे की, गाळप २०२१ -२२ मध्ये आजुबाजुचे साखर कारखान्यानी स्वतःच्या कार्यक्षेञातील उस शिल्लक ठेवून कारखाने बंद केले होते परंतु उस उत्पादकाचे नुकसान होऊ नये म्हणून श्री सुभाष शुगर ने  प्रा.लि.प्रशासने १० मे पर्यत कारखाना सुरु ठेवला परिणाम साखर उता-यात घट झाली. त्यामुळे एफ.आर.पी. दर हा थोडा कमी निघाला या वर्षी उसाचे क्षेत्र कमी असल्याने आजुबाजुचे काही साखर कारखान्याने काहीना सोबत ठेवून श्री सुभाष शुगर साखर कारखान्या संबधी अपप्रचार करित असल्याचे आमच्या निर्दशनास आलेले आहे.

याचे कारण म्हणजे या कारखानाच्या कार्यक्षेञातील ऊस गाळपास घेवून जाणे होय. कारण पाऊस चांगृला झाल्यामुळे या क्षेत्रांत भरपुर प्रमाणात उस लागवड होणार आहे. विशेष म्हणजे इसापूर धरण पुर्णपणे भरलेले असल्याने व अतिवृष्टी मुळे शेतका-याचे पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. याची जाणीव श्री सुभाष शुगर उद्योगला आहे. येणा-या उस लागवडी हंगामास उस उत्पदकांनी त्याची नोंद श्री सुभाष शुगर प्रा.लि.कडे करावी असे अहवान प्रसिद्धी पञकात करण्यात आलेले आहे.

यावर्षी जर उस गाळपास न दिल्यास लागवड खोडवा उसाची नोंद घेतल्या जाणार नाही. तसेच मागील वर्षाचा अनुभाव पाहता हे अपप्रचार करणारे काही साखर कारखाने व मंडळी कोणी ही पुढील येणाऱ्या हंगामात ऊस गाळपास स्विकारणार नाही. असा इशाराही या प्रसिद्धी पञकात देण्यात आलेला आहे. आमच्या कारखान्याकडे ज्या उस उत्पादकांनी नोंद केली आहे. यांची तर हमी कारखाना प्रशासन घेतच आहे इतर कारखान्यापेक्षा उसा दर सर्वाधिक असणार असल्याचे म्हटले आहे.

विद्युत निर्मिती प्रकल्प.. ऊस उत्पदकाच्या सह्योगामुळे श्री. सुभाष शुगर प्रा.लि हडसणी ता हदगाव कारखान्याचे २ गळीत हंगाम तर शिऊर साखर कारखान्याचे तीन ३ गळीत हंगाम झालेले आहेत. मागील दोन हंगामात कारखान्याच्या वतीने ऊस उत्पदकांना अधिक दर कश्या पद्धतीने देता येईल या करिता कारखाना व्यवस्थापनाने सतत काटकासरीने प्रयत्न केले. तशी कारखान्याची अर्थिक परिस्थिती नसतांना ही जादा दर देण्याचा प्रयत्न केलेले आहे. या पुढे पण असेच प्रयत्न राहतील दुसरी विशेष बाब अशी की  साखर कारखाना व्यवस्थापनाने शिऊर कारखाना येथे ६० KLD.आसवणी प्रकल्प तसेच हदगाव तालुक्यातील श्री सुभाष शुगर प्रा.लि.हडसणी ता हदगाव येथे १५.M.W. विद्युत प्रकल्प निर्मिती करण्याचे ठरविले आहे. आसवानी प्रकल्प काम ७०%टक्के पुर्ण झाले असुन, पुढील वर्षाच्या हंगामात प्रत्यक्षात विज निर्मितीला सुरुवात होईल असा दावा ही साखर व्यवस्थापना द्वरे देण्यात आलेला आहे. यामुळे आपल्या कारखान्यास उस देणा-या ऊस उत्पादकाला इतर कारखान्यापेक्षा जादा दर देण्यात येईल अस ही प्रसिध्द केलेल्या पञकात म्हटलेले आहे.

गाळप २०२१ -२२ मध्ये शिऊर कारखाना मर्या -वाकोठी व हदगाव तालुक्यातील श्री सुभाष शुगर प्रा.लि. या दोन्ही कारखान्यास गळीतास आलेल्या उसा करिता अंतिम भाव २४०० रु.देण्याच ठरविले आहे यापुर्वी २१०० रु प्रमाणे रक्कम  बँकेत जमा करण्यात आलेली असुन येत्या १५ दिवसात २०० रु प्रति मे टन व उर्वरित १०० रु दसरा दिवाळी दरम्यान जमा करणार असल्याची माहीती कारखाना प्रशासनाने दिली आहे सतत उस गाळीतास उसपुरवठा केल्या बद्दल कारखान्याचे चेअरमन  सुभाषराव लालासाहेब देशमुख यांनी आभार माणले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी