पंचक्रोशीतील जाज्वल्य देवस्थान
उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील शिराढोण रस्त्यावर असलेल्या जागृत देवस्थान खांडीच्या महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दररोज पहाटे पासून श्रध्दाळू भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
पवित्र श्रावण महिन्यात हिंदू समाज उपवास, ग्रंथ, पारायण, आदीसह श्रावणी सोमवार,नागपंचमी, शिवपूजन, दुर्गा गणपती व्रत ,महालक्ष्मी स्थापना पूजन, आदित्य पूजन, मंगला गोरी पूजन, ब्रम् सरस्वती पुजन,वरद लक्ष्मी वृत,रक्षा बंधन, श्रीकृष्ण जयंती,पौळा आदींची रेलचेल असते.येथील खांडीतील महादेव मंदिरात दर्शनाला उस्मान नगर परिसरा सह जिल्ह्यातून पर्यटकासह भाविक भक्तांची गर्दी होते. उस्मान नगर शिराढोण दोन्ही माळाच्या मध्यभागात असलेले महादेव मंदिर सर्वांना परिचित असलेले आहे. चाहू बाजूने हिरवागार निसर्गमय वातावरणात महादेव मंदिर असल्याने दर्शन व निसर्गमय वातावरणात भाविकांची पाहण्यासाठी गर्दी दिसून येते.
स्वयंभू दगडातील बसलेल्या नंदीच्या आकारातील या महादेव दर्शनासाठी वर्षाचे बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः श्रावण महिन्यात जवळपासच्या गावातील महिला, पुरुष भाविक मोठ्या श्रद्धेने येतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंडारा , महाप्रसादाचे आयोजन केले जाते. भाविकांच्या श्रद्धेला पावणारा महादेव म्हणून या महादेवाला ओळखले जाते.
नांदेड- उस्माननगर- शिराढोण- हळदा- कौठा- बिदर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या खांडीतील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या महादेव मंदिराची ख्याती सर्वदूर आहे. कलंबर येथील रुद्रकंठवार परिवारातील पूर्वजांनी हे मंदिर उभारल्याचे जुन्या पिढीतील अनेक वयस्कर मंडळींचे म्हणणे आहे. उस्माननगर, शिराढोण या गावांच्या भाविकांनी या मंदिरात भक्तांच्या सुविधेसाठी मोठा सभामंडप, पाण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाला गोदावरी नदीच्या पाण्याने जलाभिषेक काही तरुण भाविकांतून करण्यात येतो. पहाटे पासून ते रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते.
उस्माननगर परिसरातील हे तिर्थक्षेत्र श्रावण महिन्यात भक्तांच्या गर्दीने फुलून जाते. श्रावण पर्व काळाची सुरुवात 31 जुलै पासून झाली आहे. 27 ऑगस्ट पर्यंत च्या पूर्वकाळात भाविक भक्त विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. श्रावण सोमवार दि.१ ,८,१५,२२, तर श्रावणी शनिवार दि.६,१३,२०,२७ ऑगस्ट असे असून श्रावणातील श्रावणी अमोशा ही 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळपर्यंत असल्याने शनिवारी ग्रह ठरल्या जात आहे.भाविक भक्त भल्या पहाटेपासून गंगे द्वारे जलामृत द्वारे अभिषेकाने महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी गर्दी होत आहे.