जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ वसंतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सेवापूर्ती व वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी व्यासपीठावर माजी आ रोहिदास चव्हाण, भाजपा प्रदेश महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा प्राणिताताई देवरे -चिखलीकर, माजी उपमहापौर आनंदराव चव्हाण, भाजपा प्रदेश प्रवक्ता एकनाथ पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंगनाथ भुजबळ, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार , ज्येष्ठ नेते केशवराव चव्हाण नायगावकर , डीपीडिसीचे सदस्य अनिल मोरे,माजी जि प माधव अप्पा बेळगे, एस बी पाटील, ऍड के एम पवार, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, उपअभियंता मोहन पवार, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार, सौ वंदनाताई पवार , रुख्मिनबाई पवार,सौ सुशीला शिंदे, कोषाध्यक्ष श्रीकांत पाटील, प्रा डॉ डी एम पवार,माध्यमिक चे मुख्याध्यापक दामोदर वडजे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एच जी पवार, उर्दू शाळेचे माध्यमिक सुल्तान ,व्हाईस चेअरमन हरिभाऊ चव्हाण, कृ .भा. जाधव , यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
काँग्रेस शहराध्यक्ष वसंतराव पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वंदनाताई पवार यांचा पुष्पहार घालून मान्यवरांनी सत्कार केला व केक भरवून अभिष्टचिंतन केले. व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांची उपस्थिती होती.भाषणात राजकीय फटकेबाजी जोरदार झाली त्याच बरोबर दीर्घायुष्यसाठी अभिष्टचिंतन केले .प्रास्ताविक मुख्याध्यापक डी ई वडजे यांनी केले यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ वसंतराव चव्हाण, माजी आ रोहिदास चव्हाण, रंगनाथ भुजबळ,प्राणिताताई देवरे चिखलीकर, एकनाथ पवार, अनिल मोरे ,प्रा डी एम पवार यांची भाषणे झाली सत्कार मूर्ती वसंतराव पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली.बहारदार सूत्रसंचालन बालाजी गवाले यांनी केले.आभार मुख्याध्यापक एच जी पवार , आर आर पिठ्ठलवाड यानी मानले. शहर व परिसरातील मान्यवर, नगरसेवक, सरपंच, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी जिजामाता शिक्षण संस्था अंतर्गत शाळातील कर्मचारी व्यापारी,मिञमंडळ,व हितचिंतक उपस्थित होते.