नापिकी व कर्जबाजारीच्या चिंतेने शेतकऱ्याची आत्महत्या; तलावात सापडला मृतदेह -NNL

हिमायतनगर तालुक्यातील वायवाडी तांडा येथील दुःखद घटना


हिमायतनगर,अनिल मादसवार|
तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने नापिकी व कर्जाच्या चिंतेने आत्महत्या केली आहे. हि घटना आज दि ०२ ऑगस्ट रोजी सकाळी त्याचा मृतदेह तलावात आढळून आल्यानंतर उघडकीस आली आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा,भाऊ, भावजयी असा परिवार आहे. हरी रामधन आडे वय ६० वर्ष असे तलावात बुडून मयत झालेल्या शेतकऱ्याचा नाव आहे. या घटनेमुळे वायवाडी तांडा गावावर शोककळा पसरली आहे.


पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर तालुक्यातील डोंगराच्या पायथाच्या खाली वायवाडी गाव आहे. मौजे वायवाडी येथील शेतकरी कुटुंब आपली अल्प प्रमाणात असलेल्या जमिनीत निघालेल्या उत्पन्नावर जीवन जगत होते. यासाठी शेतकरी हरी रामधन आडे वय ६० वर्ष यांनी बैन्केकडून आणि खाजगी मध्ये कर्ज घेतले होते. मात्र सतत नापिकी होत असल्याने आणि यंदा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे ते गेल्या काहि दिवसापासून चिंतेत होते. काल दि ०१ ऑगस्ट रोजी दुपारी मला घरात झोप येत नाही मंदिरात जाऊन आराम करतो असे सांगून गेले ते परत आलेच नाहीत. रात्र झाली तरी यजमान घरी आले नसल्याने त्यांच्या पत्नींनी नातेवाईकांना सांगितले. त्यांनी सर्वत्र शोधाशोध केली मात्र कुठेत शेतकऱ्याचा शोध लागला नाही. आज दि ०२ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता त्यांचा मृतदेह येथील तलावात आढळून आला.

याची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले पोलीस निरीक्षक बी डी भुसनर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कोमल कागणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी मयताचे बंधू रामधन जयवंत आडे यांनी दिलेल्या खबरीवरून हिमायतनगर पोलीस ठाण्यात सध्यातरी शेतकरी तलावात बुडून मयत झाल्या प्रकरनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  
मयत शेतकरी अत्यंत मनमिळाऊ होता त्यामुळे गावातील लहान बालकापासून ते सर्वच जण त्यांना चांगले ओळखत होते. ते असा टोकाचा पाऊल उचलतील असा वाटलं नव्हतं. पण त्यांच्यावर बैंकेच १.५ लक्ष आणि खाजगी २.५ लक्ष कर्ज असल्याने नेहमी चिंतेत असायचे त्याचं विचारात त्यांनी तलावात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. तातडीने शासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबास शासकीय मदत मिळवून देऊन यातून सावरण्यासाठी हातभार लावावा  अशी प्रतिक्रिया मयताच्या नातेवाईकांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना दिली.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी