मला शिवसेनेचे पाच वर्षात बोलवणे आले नव्हते /लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर
हदगाव शे चांदपाशा| जेव्हा माझी 2019 विधानसभेच्या निवडणूकीवर डोळा ठेऊन असलेल्या काहींच्या सांगण्याने शिवसेनेतून हाकालपट्टी झाली. त्यानंतर मला काही सेना भवनातुन काही निरोप आला नव्हता. अशी खंत लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवघा (बाजार) येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या आयोजित परिसंवाद मेळाव्यात केली.
यावेळी आपली मणातील खद्खद व्यक्त करताना त्यांनी प्रचंड जमलेल्या कार्यकर्त्यांच्या समोर सागितले की, 2014 च्या दरम्यान मी स्वतः जाऊया नावाने आलेला शिवसेना युतीच बीफार्म दिलेला शब्द पाळण्यासाठी दुस-याचा आदर करुन दिला होता. त्यावेळी सेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी खा सुभाष वानखेडे यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती माञ माझ्या बी फार्म घेतलेले सेनेचे विद्यमान आमदार यांनी 2019 च्या विधानसभेच्या निवडणूकीत ते शब्दाला जगले नाही.
म्हणुन त्यांना अपयश नशीबी आले आता तर हदगाव विधानसभा क्षेञात शिवसेनेत आमदार करिता आता एकाचे दोन झालेत मी काय निर्णय घ्यावा. अस त्यांनी कार्यकर्त्याना अहवान करताच अनेकानी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या गटात शामिल होण्याचे एका आवाजात अहवान केले. या वेळी हदगाव हिमायतनगर विधानसभा क्षेञांतील प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते आवर्जून उपस्थित झाले होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन गोपाल सारडा यांनी केलं कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केल्याचे उपस्थितांच्या संख्येवरून दिसुन आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय नांदेडच्या हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिकांनी परिसंवाद बैठकीत मंचावर येऊन जाहीर केला शिवसेना नेते बाबुराव कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बहुसंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा आग्रह कदम यांना केला. गत विधानसभा निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने बाबुराव कदम यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती, त्यात अल्पशा मताने कदम यांचा पराभव झाला होता. त्या नंतर राज्यात घडलेल्या राजकीय बदलानंतर बाबुराव कदम यांनी आज समर्थकांचा मेळावा घेतला, या मेळाव्यात सर्वानीच शिंदे गटासोबत जाण्याची मागणी केलीय. या मेळाव्या नंतर बोलताना कदम यांनी आपण कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत असल्याचे सांगितले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हदगांवला आमंत्रित करून मोठी सभा घेऊन त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात येईल असेही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा शेतकरी नेते बाबुराव कोहळीकर यांनी स्पष्ट केले.