नांदेड| आपल्या भारत देशात शिक्षणामुळे भरपूर साहित्यिक झाले, पण दीड दिवसाची शाळा शिकून घरच्या परिस्थितीच्या वाताहातीमुळे गाव सोडून मुंबई गाठून मिळेल ते काम करुन जिद्दीला पेटून उठून दुकानावरील पाट्या वाचून स्वतःच्या बुद्धीमत्तेवर जागतिक किर्तीचे थोर साहित्यिक कोणी झाला असेल तर ते म्हणजे अण्णाभाऊ साठे होय असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. ०१ ऑगस्ट २०२२ सोमवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता प्रबोधनकार ख्यातनाम मराठी साहित्यिक तुकाराम भाऊराव साठे (अण्णाभाऊ साठे) यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
पुढे बोलताना मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, लोकशाहीर, साहित्यसम्राट, डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी भाकपचे जेष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली शाहिर अमर शेख व शहीद द.न. गव्हाणकर समवेत जनतेचे ज्वलंत प्रश्न शाहिरीच्या माध्यमातून मांडून लोक चळवळ उभी केली. अशा या महान साहित्यिकाचा आपण सर्वांनीच आदर्श घेऊन सामाजिक कार्य करण्याची काळाची गरज आहे व अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या कार्याप्रती मरणोप्रांत भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशीही त्यांनी यावेळी मागणी केली.
सर्वप्रथम आगाराचे सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. हनमंतराव ठाकूर यांच्या हस्ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मा.श्री. संदीप गादेवाड, चार्जमन शिवाजी मगर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक विठ्ठल इंगळे, सुधाकरराव घुमे, संयोजक सुर्यकांत संत्रे, माजी कर्मचारी ज्ञानेश्वर सावळे, कामगार नेते जय कांबळे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, राजेश गहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. गजानन देगावे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून या कार्यक्रमाची सांगता केली. याप्रसंगी कर्मचारी नितीन मांजरमकर, नवनाथ मुंडे, सुमीत महाजन, ज्ञानोबा तेली, विजय सुर्यतळे, आशा डोईबळे, श्वेता तेलेवार, केशव टोंगे, गंगाधर वाघमारे, शेख युनूस, नवनाथ मुंडे, आनंदा कंधारे, धनंजय बनभैरु, गोविंद सोनटक्के, लक्ष्मण शिरकंठे, शिवचरण मळगे इत्यादी कर्मचारी बंधु- भगिणी उपस्थित होते