अर्धापूर, निळकंठ मदने| संपूर्ण जगात कोरोना महामारी चे संकट उभे राहिले होते यामध्ये कित्येकांना आपला जीव गमवावा लागला होता. कोरोना महाभयंकर रोगाने कुटुंबातील प्रमुख बळी ठरल्याने अनेक कुटुंबांना यामधुन सावरणे कठीण झाले होते परंतु तेजस देशमुख या 18 वर्षीय युवकाने कुटुंबाची कमान पेलण्यासाठी आईच्या धाडसी बळातून मिनरल वॉटर प्लांट उभारण्याचा निर्णय घेऊन एक आदर्श समोर ठेवला आहे.
बारड ता मुदखेड येथील रघुजी उर्फ बापू किसनराव देशमुख (वय ४०) यांचा कोरोना महामारी रोगात बळी गेला होता. कुटुंब प्रमुख हिरवल्याने कुटुंबावर मोठे संकट उभे राहिले होते. यानंतर रघोजी देशमुख यांच्या कोरोना निधनानंतर आई कोंडाबाई किसनराव देशमुख तसेच वडील किसनराव जळबाजी देशमुख काही दिवसातच कोरोनाचे बळी ठरले यामुळे संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला होता. या धक्क्यातून सावरण्यासाठी रघुजी देशमुख यांच्या पत्नी संगीता रघुजी देशमुख यांच्यावर दोन मुलांसह चालवण्याची मोठी जबाबदारी पडली. यामध्ये मोठा मुलगा वरद देशमुख मतिमंद आहे. दुसरा मुलगा तेजस देशमुख खेळण्या बागडण्याच्या वयातच असताना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी व्यवसाय उभारण्याची वेळ आली.
संगीता देशमुख यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी तेजस देशमुख यांना अल्पशा भांडवलातून मिनरल वॉटर प्लांट उभा करून दिला आहे. या माध्यमातून गावातील लोकांना घरपोच मिनरल वॉटर पोहोचविण्याचा आगळावेगळा व्यवसाय सुरू केला आहे. यासोबतच सार्वजनिक कार्यक्रमास स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा संकल्प केला आहे.
कोरोनाच्या महामारीत एकाच कुटुंबातील एक न्हवे,दोन न्हवे तर तिन प्रमुख व्यक्तींचा जीव गेला असल्याने या हादशातुन सवरण्यासाठी संगीता देशमुख तसेच मुलगा तेजस देशमुख यांनी मिनरल वॉटर प्लांट उभारून उदरनिर्वाहाचा मार्ग शोधला आहे. या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी सरसावले आहेत. या वरद मिनरल वॉटर प्लांट चे उद्घाटन सरपंच प्रभाकर आठवले, उपसरपंच बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कोरोना महामारीच्या संकटातील देशमुख कुटुंबीयांना या नवीन व्यवसायातून नवसंजीवनी मिळणार आहे.
