नांदेड| प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड – येशवंतपूर - नांदेड आणि काचीगुडा-नगरसोल-काचीगुडा या दोन विशेष रेल्वे च्या दोन फेऱ्या चालविणार आहे. तसेच जालना-मालकाजगिरी-जालना डेमू ला मुदत वाढ देण्यात आली आहे, ते पुढील प्रमाणे --
अनु क्र. | गाडी क्र. | कुठून – कुठे | दिवस | दिनांक |
1 | 07093 | नांदेड-येशवंतपूर | मंगळवार | 30.8.2022 |
07094 | येशवंतपूर-नांदेड | बुधवार | 31.8.2022 | |
2 | 07097 | काचीगुडा-नगरसोल | रविवार | 28.8.2022 |
07098 | नगरसोल-काचीगुडा | सोमवार | 29.8.2022 |
1) गाडी क्र. 07093 नांदेड-येशवंतपूर विशेष गाडी:
हि गाडी नांदेड रेल्वे स्थानकावरून दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 13.35 वाजता सुटेल आणि मुदखेड, निझामाबाद, काचीगुडा, कर्नुल टाऊन, धर्मावरम मार्गे येशवंतपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 10.30 वाजता पोहोचेल.
2) गाडी क्र. 07094 येशवंतपूर –नांदेड विशेष गाडी: हि गाडी येशवंतपूर रेल्वे स्थानकावरून दिनांक 31 ऑगस्ट रोजी 17.20 वाजता सुटेल आणि धर्मावरम, कर्नुल टाऊन, काचीगुडा, निझामाबाद, मुदखेड मार्गे नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.30 वाजता पोहोचेल.
3) गाडी क्र. 07097 काचीगुडा-नगरसोल विशेष गाडी: हि गाडी काचीगुडा रेल्वे स्थानकावरून दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 20.20 वाजता सुटेल आणि निझामाबाद, मुदखेड, नांदेड, परभणी, औरंगाबाद मार्गे नगरसोल येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 08.35 वाजता पोहोचेल.
4) गाडी क्र. 07098 नगरसोल –काचीगुडा विशेष गाडी: हि गाडी नगरसोल येथून दिनांक 29 ऑगस्ट रोजी रात्री 22.00 वाजता सुटेल आणि औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, निझामाबाद मार्गे काचीगुडा येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 09.45 वाजता पोहोचेल.
5) दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.
6) या दोन्ही गाड्यात वातानुकुलीत, स्लीपर क्लास आणि जनरल चे डब्बे असतील.
गाडी क्र. 07254/07428 जालना – मालकाजगिरी - जालना डेमू ला मुदत वाढ
1. गाडी क्र. 07254 जालना- मलकाजगिरी- डेमू गाडी ला मुदत वाढ देण्यात आली आहे. हि गाडी जालना रेल्वे स्थानकावरून दिनांक 26 ऑगस्ट आणि 2, 9, 16, 23, 30 सप्टेंबर, , 2022 रोजी सुटेल.
2. गाडी क्र. 07428 मलकाजगिरी – जालना : या डेमू रेल्वे ला मुदत वाढ देण्यात आली आहे. हि गाडी मलकाजगिरी रेल्वे स्थानकावरून दिनांक 27 ऑगस्ट आणि 3, 10, 17, 24 सप्टेंबर आणि 01 ओक्टोंबर, 2022 रोजी मलकाजगिरी रेल्वे स्थानकावरून सुटेल.
