नांदेड| दि.१० ऑगस्ट रोजी नांदेड शहरात 'हर घर तिरंगा' अभियान, आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रचारासाठी 'तिरंगा रॅली' नांदेड शहरातील ज्ञान माता विद्या विहार विद्यालयातून काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन अनुराधा ढालकरे, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिराकी कार्यालय नांदेड यांच्या हस्ते हीरवी झेडी दाखवून करण्यात आले. यावेळी ज्ञान माता विद्यालयाचे प्राचार्य फादर शिजूमोन यांची प्रमुख उपस्तिथी होती.
नांदेड येथील भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि ज्ञान माता विद्यालयाच्या संयुक्त या 'तिरंगा रॅली'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अहमदनगर केंद्रीय संचार ब्यूरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सूमित दोडल यांच्या सर शाळेतील १०० शिक्षक आणि जवळपास १२०० विद्यार्थानी सहभाग घेतला,
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात भारतीय तिंरगा कापडी राष्ट्रध्वज होता. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीत 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'इन्कलाब जिंदाबाद', 'सारे जहां से अच्छा हिन्दोस्तां हमारा' व 'विजय विश्व तिरंगा प्यारा' या सारख्या राष्ट्रप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.ही रॅली ज्ञान माता विद्यालय ते नाथनगर-पांडूरंगनगर ते नमस्कार चौक अशी काढण्यात आली
तिरंगा रॅलीत शुभेच्छा देतांना श्रीमती ढालकरी म्हणाल्या, देशातील प्रत्येक नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत राहावे तसेत प्रत्यकांनी नागरिकांनी येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकून या राष्ट्रीय महोत्सवात सामिल व्हावे असे आवाहन त्यांना केले
श्री.जायभाये म्हणाले, नांदेड शहरातील रेल्वे स्टेशनच्या प्रांगणात दिनांक १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सकाळी ९ ते रात्री ८ वाजेपर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडींचे छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १८५७ ते १९४७ भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा चित्र आणि माहिती स्वरुपात मांडण्यात आली आहे. सर्वांसाठी विनामुल्य खूले राहणाऱ्या या प्रदर्शनाचा आबालवृध्दांनी लाभ घ्यावा.