नविन नांदेड। नांदेड जिल्हा गणीत अध्यापक मंडळ नांदेड चा सचिव पदी इंदिरा गांधी हायस्कूल हडको सह शिक्षक ओकांर सुधाकरराव अंबुलगेकर यांच्यी सचिव निवड करण्यात आली आहे,या निवडीबद्दल शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
नांदेड जिल्हा गणीत अध्यापक मंडळाच्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक एस.एस.भालके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी आगामी तिनं वर्षांचा नुतून जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली,यात अध्यक्ष प्रशांत यन्नावार, उपाध्यक्ष टि.एस.शिंदे, जाधव व्हि.एन. सहसचिव कदम आर.एच.कोषाधयक्ष गोळेगावकर बि.एस.व कार्यकारिणी सदस्य डी.एस. कुलकर्णी, डि.ए.मांजरमकर,ए.डी.मोरे,एस.ए.कालमेघ,बि.बी.पाटील ,एच.डी.साताळे,एम.पी.श्रीरामे,सौ.डी. व्हि.सोमावार,परिक्षा समिती प्रमुख बि.डी.वानखेडे आदिंची बिनविरोध निवड करण्यात आली.
इंदिरा गांधी हायस्कूल हडको चे सहशिक्षक ओ.एस.अंबुलगेकर यांच्यी सचिव पदी निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक लक्ष्मण माचलोड व उपमुख्याध्यापक विलास देवसरकर, पर्यवेक्षक गोविंदवाड,व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करून शुभेच्छा दिल्या. मंडळाच्या वतीने गणीत विषयांमध्ये आवड निर्माण करणे,संबोध स्पष्ट करणे , स्पर्धा परिक्षेतील उदाहरणे सोडविणे, इत्यादी सराव होण्यासाठी व विविध परिक्षाचे आयोजन करण्यात येते हा उद्देश आहे.
