घरचा करता व्यक्ती गेल्याने कुटुंब उघड्यावर, शासनाने तातडीने मदत घ्यावी
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात आत्तापर्यंत ५ शेतकऱ्यांनी नापिकी व कर्जबाजारील कंटाळून आत्महत्या केलेल्या असून, त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला अद्यापही क्षणाची मदत मिळाली नाही. आणि शासनाने नुकसान भरपाई बाबतही ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाहीत. अश्याच चिंतेने ग्रस्त झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील सोनारी येथील शेतकऱ्याने विषारी औषध प्रश्न करून मृत्यूला कवटाळले आहे. विजय जयराम वाघमारे वय ४७ वर्ष असे मयत शेतकऱ्याचं नाव आहे.
हिमायतनगर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या खाईत लोटले आहे. न भूतो न भविष्यती असे नुकसान वरून राजा कोपल्यान झाल आहे. अतिवृष्टीनंतर आजही अनेक शेतातील पाण्याचा पाझर सुकला नसल्याने शेतातील पिकांची वाढ खुंटली आहे. यामुळे शेतात पेरणीसाठी केलेला खर्चदेखील निघेल कि..? नाही अशी शंका निर्माण झाली आहे. अतिवृष्टीनंतर हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली. मात्र अद्यापही याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे हिमायतनगर तालुक्यात शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.
अश्याच समस्येने ग्रस्त झालेल्या हिमायतनगर तालुक्यातील मौजे सोनारी येथे पांरपारीक पद्धतीने शेती करनारे विजय जयराम वाघमारे वय ४७ यांनी सततच्या नापीकीला, यंदा नैसर्गिक अपत्तीमुळे पिक वाया गेले त्यामुळे काही दिवसापासून चिंताग्रस्त झाले होते. याचा विवंचनेत त्यांनी दि. २२ रोजी आपल्या शेतातील विषारी औषध प्राशन केले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी नांदेडला नेले होते. तेथे उपचार सुरु असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर रात्रीला ७.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंकर करण्यात आले आहे. एकीकडे अतिवृष्टीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले असून, आता सरकारच्या चुकीच्या धोरनामुळे शेतकरी पुन्हा अडचीनत सापडतो आहे. यामुळे पुढील जीवन कसे जगावे, कुटुंबाचा पालन पोषण कसं करावं अश्या चिंतेने आणि सततच्या पावसामुळे पिक वाया गेल्याने आत्महत्या केली असल्याचे मयत शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.
मयत शेतकरी यांचे नवे ३ एकर शेती असून, ते अल्पभूधारक आहेत, यंदा शेतातील सर्वच पीक गेल्यामुळे ते व्यथित झाले होते. त्यातच बैन्केकडून घेतलेलं कर्ज आणी गटाचे कर्ज यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर वाढल्यामुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेने तो ग्रस्त झाला होता. याच विचारात त्यांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. शेकऱ्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, 2 मुले, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. घरचा करता व्यक्ती गेल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून, परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तातडीने मदत द्यावी अशी मागणीही केली आहे.
