गणेशोत्सवात वीज पुरवठा आंखडीत राहावा, रस्ते स्वच्छ व खड्डे बुजवण्यात यावेत-विहिप बजरंग दल -NNL


नांदेड।
31सप्टेंबर पासून हिंदू धर्माचा धार्मिक उत्सव गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. हिंदू गणेशोत्सव धार्मिक रित्या मोठ्या आनंदोत्सावात साजरा करतात. सध्या नांदेड शहरात बऱ्याच रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत व रस्ते अस्वच्छ आहेत त्यामुळे श्री गणेशाची मूर्ती आणताना व विसर्जन मिरवणुकीत बरीच अडचण येणार आहे स्ट्रीट लाईट सुद्धा बंद आहेत .तसेच दर वेळेस गणेशोत्सवात वीज ही आरतीच्या वेळेस जात असते.त्यामुळे आनंदोस्ववात व्यत्यय येते.

गणेशोत्सवात गणेश मंडळाना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी सर्व रस्ते स्वच्छ व रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवण्यात यावेत व बंद असलेले स्ट्रीट लाईट पुन्हा चालू करावेत असे निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दल ने माननीय आयुक्त साहेबाना निवेदन दिले. गणेशोत्सवात विज पुरवठा अखंडीत राहावा अशे निवेदन विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे महावितरण मुख्य अभियांतास देण्यात आले.

यावेळेस विहिप जिल्हामंत्री शशिकांत पाटील, महानगर अध्यक्ष श्रीराज चक्रवार, महानगर मंत्री गणेश कोकुलवार,बजरंग दल जिल्हा सह संयोजक महेश देबडवार, बजरंग दल शहर संयोजक कृष्णा इंगळे, सह संयोजक अक्षय ठाकूर,विहिप सह सतसंग प्रमुख वैभव दरबस्तवार, विहिप प्रसार प्रसिद्धी प्रमुख राम मुलांगे हे उपस्थित होते

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी