उस्माननगर, माणिक भिसे। येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मिश्रक राजकुमार मुरलीधर रुद्रवार हे वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्याने दवाखान्यात त्यांचा सहपत्नीक सत्कार करून भावपुर्ण निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदगावे हे होते.यावेळी डॉ.नंदगावे म्हणाले की , शासनाची नौकरी असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार निवृत्त व्हावे लागते.रुद्रवार यांचा स्वभाव हा शांत ,व मनमिळावू, धार्मिक वृत्ती व अभ्यासु (मिश्रक )कर्मचारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.रुद्रवार हे रुग्णानाचे माऊली होते.
मागील दोन वर्षात कोरोना सारख्या महामारीच्या आजारात आळस झटकून मेडिकल आणत होते. जन सेवा हिच ईश्वर सेवा समजून रुग्णांची सेवा.केली.१९८७ मध्ये कोलंबी , नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये गॅस्ट्रो ची लागन झाली होती.एका गावांमध्ये लहाना पासून ते वडील माणसांना विषबाधा झाली होती.तिथे स्वता: उपस्थित राहून रात्रभर, दिवसा त्यांना सेवा देऊन त्यांना ठणठणीत केले. त्यांनी केलेली सेवा ही हासत खेळत जनसेवा हिच ईश्वर सेवा म्हणत राजकुमार रुंद्रवार यांनी ३८ वर्ष निस्वर्थ होऊन रुग्णांना वेळेवर औषधे पुरवली.
रुद्रवार परिवाराचे जीवन सुख समाधानात जावो अशी आशा व्यक्त केली. यावेळी वैद्यकीय महीला अधिकारी सह अनेक कर्मचारी, यांनी कार्याचा,(कामाचा ) गौरव करुन त्यांचे पुढील आयुष्याला शुभेच्छा दिल्या. उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सचिव प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष माणिक भिसे , कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे सहि यावेळी सौ.निर्मला राजकुमार रुंद्रवार ,रोहीत रुद्रवार ,ॠषीकेश रुद्रवार ,सौ.सपना रूद्रवार , महेंद्र बोरलेपवार बारुळकर ,सौ.दुलेवाड मॅडम ,श्री , देशपांडे ( सुपरवायझर आ.सहाय्यक ) , चक्रधर ( आरोग्य सहाय्यक) श्रीमती कांबळे ( आरोग्य सहाय्यिका ) श्रीमती मगरे ( आरोग्य सेविका)श्री ईटकापल्ले ( आरोग्य सेवक) श्री.मुस्तापुरे ( प्र.शा.तंत्रज्ञ) श्रीमती साखरे ( आरोग्य सेविका) यांच्या सह प्रा.आ.केद्रार्तगत येणाऱ्या पाच उपकेंद्राचे सर्व सामुदायिक आरोग्य अधिकारी व कर्मचारी सेवक मोठ्या संख्येने हजर होते.