मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड तालुक्यातील गेल्या ३७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लेंडी प्रकल्प बाधित मौजे मुक्रमबाद येथील लेंडी धरणासाठी संपादित केलेल्या अंदाजे २५०० कुटुंबांचे दि.१ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या शासन अध्यादेशानुसार स्वेच्छा पुर्नवसन करण्याचे योजिले आहे.
या प्रकल्पग्रस्तांना प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेचा लाभ मिळवुन देणे अत्यंत आवश्यक विषय आहे. प्रकल्पग्रस्तांना शासनाच्या पुनर्वसन लाभाच्या १८ योजनेच्या ऐवजी २२ योजनेचा समावेश या प्रकल्पग्रस्तांना लागू करण्यात यावा. त्यासाठी संबंधित विभागास आपल्या स्तरावरून तात्काळ स्तरावरून आदेशीत करून मुक्रामबाद येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय द्यावे.
अशी मागणी लोकप्रिय आ.डॉ.तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे मुखेड तालुका सरचिटणीस हेमंत अप्पा खंकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.