किनवट, माधव सूर्यवंशी| पिता पुत्राचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाला सुऱ्याने भोसकून गंभिर जखमी केल्याने तरुणाचा मृत्यू झाला .ही घटना रामनगर नाला गडा भागात आज दिनांक ६ जुलै रोजी १ वाजता घडली .
याबाबत पोलिस सुत्रा कडून प्राप्त माहिती अशी की , शहरातील रामनगर नालागडा भागातील तोडसाम कुटुंबातील दिलीप तोडसाम व त्यांचा मुलगा तिरुपती तोडसाम या पिता पुत्रा मध्ये आज दुपारी १२.४५ च्या सुमारास भांडण सुरु होते . भांडण सुरु असताना शेजारी राहाणारा भारत रामकिशन डोईफोडे हा विवाहीत तरुण त्यांचे भांडण सोडवण्यासाठी व समजावून सांगण्या साठी गेले होते. यावेळी तु आमच्या घरच्या भांडणात कशाला पडतोस म्हणून तिरुपती दिलीप तोडसाम या तरुणाने रागाच्या भरात भांडण सोडण्यासाठी आलेल्या भारत रामकिशन डोईफोडे या तरुणाला आपल्या जवळील सुऱ्याने नाकावर जबर वार केल्याने गंभिर दुःखापत झाली.
त्यास तातडीने उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरने मृत घोषित केले . अशी माहीती पोलिसानी दिली . या प्रकरणी मयत भारत डोईफोडे यांच्या पत्नी शुंभागीनी भारत डोईफोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किनवट पोलिसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती . मयत भारत यास तीन मुली असल्याचे समजते . सदरील आरोपीस पोलिसानी ताब्यात घेतले आहे . या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे