लोहा| स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्ताने मोठ्या उत्साहात लोहा तालुक्यात साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने तालुक्यातील प्रत्येक गावात शहरात व घरावर राष्ट्रध्वज लावावेत व राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा असे आवाहन तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी केले आहे.
जुना लोह्यातील शिवछत्रपती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात तसेच श्री संत गाडगे महाराज विद्यालयात तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्र ध्वज वाटप करण्यात आले त्यावेळी तहसीलदार मुंडे यांनी मार्गदर्शन केले बिईओ रवींद्र सोनटक्के, शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, प्राचार्य बोधगिरे, उपप्राचार्य अमर दापके,शिवछत्रपती शाळेचे मुख्याध्यापक दामोदर वडजे, मुख्याध्यापक एच जी पवार, पर्यवेक्षक बी डी जाधव हरिभाऊ चव्हाण ,लोहा तलाठी मारुती कदम, तलाठी पाईकराव, कै नळगे विद्यालयाचे तांबोळी सर, यासह मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
तहसीलदार मुंडे यांनी तालुक्यातील काही शाळांना राष्ट्र ध्वज दिले त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना आवाहन केली की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभरात व राज्यात मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे त्यासाठी विविध शालेय उपक्रम राबविले जात आहे.१३ ते १५ ऑगस्ट या काळात प्रत्येकांनी घरावर झेंडा लावावा. तो लावताना ध्वज संहिता पाळण्यात यावी ध्वजाचा अपमान होणार नाही याची प्रत्येकांनी काळजी घ्यावी तसेच प्रत्येकांनी राष्ट्र ध्वज घरावर लावला असे आवाहन तहसीलदार मुंडे यांनी केले. यावेळी शिव छत्रपती प्राथमिक व माध्यमिक शाळेत तहसीलदार मुंडे यांचा आर आर पिठाळवड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.