दीड हजारांची लाच स्वीकारणाऱ्या बिलोली नगरपरिषदेच्या वरिष्ठ लिपिकास अटक -NNL


नांदेड/बिलोली|
जिल्ह्यातील बिलोली येथील नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ महिला लिपिकास तक्रारदाराकडून दीड हजारांची लाच स्वीकारताना नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.  

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सौ. कमल पिराजी तुमडे, वय ४७ वर्षे,व्यवसाय - शासकीय नोकरी, वरिष्ठ लिपिक यांनी तक्रारदार यांच्या सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ५,०००/- रु.  लाचेची मागणी करून रक्कम जमा करण्यापूर्वी ३,५००/- रु. व रक्कम तक्रारदार यांच्या खात्यात जमा केल्यानंतर १५०० रुपये देण्याची ठरविले होते. त्यानुसार दुसऱ्यांदा रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी याबाबतची तक्रार दि.१७/०८/२०२२ रोजी दिली होती. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे हंडीकरी यांनी दि.१८ रोजी लाच पडताळणीसाठी सापळा रचला. यात लाच मागणी पडताळणी केली असता त्यादरम्यान तक्रारदाराकडून १,५००/- रु. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारली आहे. यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रक्कमेसह लाचखोर आरोपीला अटक केली असुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदर सापळा कार्यवाही डॉ राजकुमार शिंदे, पोलीस अधिक्षक,  ला.प्र.वि. नांदेड, परिक्षेत्र नांदेड, धरमसिंग चव्हाण, अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि.नांदेड, परिक्षेत्र नांदेड. पर्यवेक्षण अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी नानासाहेब कदम पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, सहाय्यक सापळा अधिकारी, शेषराव नितनवरे पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. नांदेड यांनी सापळा कारवाई पथक पोना एकनाथ गंगातिर्थ, जगन्नाथ अनंतवार,ईश्वर जाधव, मुजीब शेख, मपोना मेनका पवार, ला.प्र.वि.युनिट नांदेड यांच्या सहकार्याने केली आहे.

या घटनेचा पुढील तपास अधिकारी नानासाहेब कदम  पोलीस निरीक्षक,ला.प्र.वि. नांदेडहे करीत असून, नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी डॉ राजकुमार शिंदे,पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नांदेड परिक्षेत्र,नांदेड ,मोबाईल क्रमांक ९५२०६१०६१९, राजेंद्र पाटील, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड, मोबाईल क्रमांक - ७३५०१९७१९७, कार्यालय दुरध्वनी - ०२२६२-२५३५१२, @ टोल फ्रि क्रं. १०६४ वर संपर्क साधावा असे कळविले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी