असंघटित,हॉकर्स आणि घरेलू युनियनची नूतन कार्यकारणीची एकमताने निवड
नांदेड। सीटू संलग्न असंघटित कामगार संघटना,महानगर हॉकर्स युनियन आणि नांदेड जिल्हा घर कामगार संघटनेची त्रेवार्षिक सभा गांधी नगर येथील दलित मित्र धनाजीराव घोडजकर सभागृहात दि.१८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
सभेचे अध्यक्ष जेष्ठ कामगार नेते कॉ. विजय गाभणे हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये सीटूच्या जिल्हा अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या त्यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ. अशोक बनसोड यांनी शुभेच्छा दिल्या तर जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांच्या भाषनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सपन्न झालेल्या सभेने खालील नूतन कमीट्यास एकमताने मंजुरी दिली आहे.
त्यामध्ये असंघटितच्या अध्यक्षा कॉ.सुंदरबाई वाहूलकर, सचिव कॉ. जनार्धन काळे, कार्याध्यक्ष कॉ.श्याम सरोदे,उपाध्यक्ष कॉ. गंगाधर खुणे, सहसचिव कॉ. सोनाजी कांबळे, भास्कर पाटोळे, कोषाध्यक्ष कॉ. जयराज गायकवाड संघटक सचिन कंधारे, कॉ. सुभाषचंद्र गजभारे,राजू पळसकर, संदीप राक्षेसे, गोपीनाथ देशमुख. घर कामगार संघटनेच्या अध्यक्ष कॉ.करवंदा गायकवाड, सचिव कॉ. लता गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. जयश्री झंपलवाड, कॉ. वदंना दास, सहसचिव कॉ. लक्ष्मी पाटणे, कोषाध्यक्ष कॉ.उज्वला पडलवार, सहसचिव कल्पना पांचाळ, संघटक कॉ. सुरेखा गंगाटीरे, माधुरी भटलाडे.
नांदेड महानगर हॉकर्स युनियन अध्यक्ष कॉ. मारोती केंद्रे,सचिव कॉ. मुकेश गर्दनमारे, उपाध्यक्ष कॉ. गंगाधर गायकवाड, सहसचिव कॉ. बंटी वाघमारे, उपाध्यक्ष कॉ.विष्णुपंत एडकेवार,सहसचिव शोभबाई धाडे, कोषाध्यक्ष कॉ. ऍड.प्रवीण कंधारकर,सहसचिव कॉ. लक्ष्मीबाई भिसे, संघटक कॉ. माधव बसवंते, मीनाबाई दास आदींची एकमताने निवड करण्यात आली. नूतन कमिटीस पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.