नांदेड के हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत २०२२ झेंडे मोफत वाटणार - धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर -NNL

भाजपा व लायन्स तर्फे नांदेड के हर घर तिरंगा उपक्रम ; दिलीप ठाकूर यांचा नवीन उपक्रम:२०२२ तिरंगे झेंडे घरोघरी वाटणार


नांदेड|
वर्ष २०२२ मध्ये होणाऱ्या हिंदुस्तानच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ‘ नांदेड के हर घर तिरंगा ’ हा उपक्रम भाजपा महानगर नांदेड तसेच लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा च्या वतीने राबविण्यात येणार असून यामध्ये २०२२ तिरंगे ध्वज मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, लायन्स बहुप्रांतीय अध्यक्ष दिलीप मोदी, लायन्स प्रांतपाल पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागात घरोघरी जाऊन तिरंगे झेंडे वितरित करण्यात येणार आहेत.  या अभियानासाठी प्रत्येकी १०० झेंडे देणाऱ्या देणगीदारामध्ये लायन्स झोन चेअरमन संजय अग्रवाल, धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर,सिद्राम सुर्यभान दाडगे चैतन्यनगर नांदेड,भाजपा नांदेड ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड,  भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य संध्याताई  राठोड, पोस्ट बचत एजंट संघटना प्रदेश उपाध्यक्ष  सचिन शिवलाड, भाजप महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नांदेड जिल्हा सहप्रभारी डॉ.शितल भालके,विजय दत्तात्रयराव कुलकर्णी बोराळकर बजाज सिटी नांदेड,

भाजपा महिला मोर्चा तालुका किनवट अध्यक्षा सागर ज्ञानेश्वर शिंदे, हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर च्या  प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते, ज्येष्ठ पत्रकार प्रा.डाॅ. एस एस जाधव  धर्माबादकर भावसार चौक नांदेड,रमाकांत संभाप्पा भंडारे भावसार चौक अनिकेत नगर नांदेड, उमा विजय कुलकर्णी बजाज सिटी नांदेड,तौसीफ अहमद सीईओ इसरीड टेक्नॉलॉजी नांदेड, भूषण वसंत सुवर्णकार यांचा समावेश आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा महिला प्रदेशाध्यक्षा तथा भाजपा नांदेड जिल्हा महिला उपाध्यक्षा सुषमा ठाकूर ,प्रतिष्ठित व्यापारी संंतराम गीते,भाजपा महिला मोर्चा बडनेरा अमरावती अध्यक्षा सतनामकौर हुडा,वसंत अहिरे  सोनईनगर नांदेड,रवी  जयस्वाल  रामचंद्र लॉज बस स्थानक नांदेड,सीए विकास  काबरा,आर्किटेक कार्तिक मालिवार घनश्याम, डॉ. वीरेंद्र अवधिया संजीवनी हॉस्पिटल नांदेड यांनी प्रत्येकी ५० झेंडे दिले आहेत. 

३३ तिरंगे झेंडे देणाऱ्या मध्ये  शिवा शिंदे,डॉ. अमोल हिंगमिरे,सदाशिव महाजन यांचा समावेश आहे.संयोजक दिलीप ठाकूर यांनी संजय अग्रवाल व सचिन शिवलाड यांच्यासोबत नांदेड येथील डाकघर अधीक्षक राजीव पाळेकर यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत ' नांदेडके हर घर तिरंगा ' या उपक्रमाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी दिलीप ठाकूर यांना पाळेकर यांनी तिरंगा ध्वज भेट दिला. याप्रसंगी डाकघर उपअधीक्षक डी.आर. शिवनीकर व एस.आर. मामीडवार, पोस्टमास्तर एस. एस. भिसे, सहाय्यक पोस्ट मास्तर एस. एस. ठाकूर, विनोद शेट्टी, पि.के. पवार हे उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत  २×३ चा तिरंगा झेंडा, काठी व दोरी यासाठी दानशूर नागरिकांनी १०० झेंड्यांसाठी ₹ ३०००/- मदत करायची आहे. आर्थिक मदत करणाऱ्यांच्या नावाचे स्टिकर झेंड्याच्या दांड्यावर चिटकवण्यात येणार आहे. तसेच देणगीदारांची यादी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध करून दररोज ३०००० लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, लायन्स सेंट्रल अध्यक्ष शिवा शिंदे,सचिव डॉ. अमोल हिंगमिरे, कोषाध्यक्ष सदाशिव महाजन, लायन्स अन्नपूर्णा अध्यक्ष अरुणकुमार काबरा,सचिव बिरबल यादव,कोषाध्यक्ष सविता काबरा यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी