उस्माननगर परिसरात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
येथील शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच पत्रकार सभागृह , येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व  साहित्यरत्न,थोर समाजसुधारक, विचारवंत, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती  विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. समता विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक राजीव अंबेकर व गणेश सोनवणे यांची उपस्थिती होती. सर्व प्रथम  लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.   


पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यां साठी दोन गटात वक्तृत्व स्पर्धे चे अयोजन करण्यात आले होते. यात विद्यालया तील छत्तीस विद्यार्थांनी सहभाग  घेऊन थोर समाजसुधारक, विचारवंत, महापुरुषांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकणारी भाषणे केली.यामुळे लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सह अन्य महापुरुषाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यानी ध्येय सफल करावे असे आवाहनही यावेळी बोलताना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.वकृत्व भाषाण स्पर्धेतील विजेत्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त झेंडावंदन दिवशी प्रमुख अतिथीच्या उपस्थिती विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे . या दोन तास चाललेल्या सुरेख कार्यक्रमा चे सुत्रसंचल इयत्ता दहावी तील विद्यार्थीनी ननीशिंगधा गजभारे व श्वेता मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या येशस्वेतेसाठी सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी यांना परीश्रम घेतले.


सम्राट अशोक प्राथमिक शाळा येथे मुख्याध्यापक राहुल सोनसळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी केली.यावेळी   उत्कृष्ट भाषाण केलेल्या मुला,मुलींना शालेय साहित्याचे बक्षीस देवून गौरविण्यात आले.याप्रसंगी मन्मथ केसे , भगवान राक्षसमारे , देविदास डांगे , नितीन लाटकर , शखिल शेख ,श्रीमती  मणीषा सोनसळे, यांच्यासह विद्यार्थी शिक्षक यांनी थोर समाजसुधारक विचारवंत महापुरुषांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकणारी भाषणे झाली. 

जि.प.के.प्रा.शाळा येथे मुख्याध्यापक जयवंतराव काळे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.त्यानंतर लोकमान्य टिळक व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली.यावेळी एकनाथ केंद्रे ,शेख , यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच , उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य,नागरिक कर्मचारी उपस्थित होते.

उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार सभागृह येथै अध्यक्ष विठ्ठल ताटे पाटील यांच्या अध्यक्षस्थानी बैठकीत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले.यावेळी सुर्यकांत मालीपाटील , माणिक भिसे ,प्रदीप देशमुख , गणेश लोखंडे, अमजदखान पठाण,लक्ष्मण कांबळे,यांची उपस्थिती होती.पठाण अमजदखान यांचा यावेळी वाढदिवस साजरा करण्यात आला.उस्माननगरपरिसरातील शाळा महाविद्यालये येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी