नागराजाच्या मूर्तीसहः वारुळांची सुवासिनीकडून पूजा
उस्माननगर माणिक भिसे । उस्माननगरसह परिसरात मंगळवार रोजी नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात वारुळाची पुजा करून व झोके,भुलई म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी निमित्ताने परिसरातील श्री विठ्ठल रुक्मिणी , महादेव मंदिरातील नागराजाच्या मूर्तीची व विविध ठिकाणी वारुळांची सुवासिनींच्या हस्ते पारंपारिक पद्धतीने विधिवत पूजन करण्यात आले. या दिवशी महादेवाची आणि नागदेवतेची पूजा करून पुरणाचे दिंड करण्याची प्रथा आहे. यावेळी लाह्या फुटाण्याचा नवेद्य अर्पण केल्या जातात. सकाळपासूनच मंदिरामध्ये नागराजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती.
दुपारनंतर महिलांनी नागपंचमी निमित्ताने फुगड्यांचा फेर धरत झोपाळ्याचा देखील मनमुराद आनंद लुटला. श्रावणातील हा पहिलाच सण असून यानिमित्ताने माहेरवाशीण आपल्या माहेरी येतात. समता विद्यालय येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी यांनी शाळेतील सहशिक्षिका यांच्या सोबत भुलया साठी गोल रिंगण करून मध्यभागी मराठी विषयाचे शिक्षक ना.ना.लोंढे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना मध्येभागी उभे केले होते. शाळेतील मैत्रीणी एकत्र येऊन सुंदर भुलया म्हणून सण उत्साहात साजरा केला.