लोहा शहरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी -NNL


लोहा|
साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती लोहा शहरात मोठ्या उत्साहात साजरी झाली .शहरातील जुन्या भागातील साठे गल्ली येथे आ श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्या नंतर मान्यवरांची भाषणे झाली. पांडुरंग दाढेल व जयंती मंडळा च्या मार्गदर्शना खाली शहरातून मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक निघाली होती.

लोहा शहरात साहित्य रत्न अण्णा भाउ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. जुना लोहा साठे नगर येथे आ श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंतराव पवार,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार,  डीपीडीसी चे सदस्य अनिल मोरे, माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार,खविसं व्हाईस चेअरमन श्याम पाटील पवार,  नगरसेवक संभाजी चव्हाण, नगरसेवक बबन निर्मले, माजी नगरसेवक पंकज परिहार , शरफोद्दीन शेख,अनिल दाढेल संयोजक पांडुरंग दाढेल, उत्तम महाबळे यासह मान्यवर .यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. सायंकाळी शहराच्या मुख्य रस्त्याने  साहित्य रत्न  अण्णाभाऊसाठे यांच्या पुतळ्याची  भव्य मिरवणूक काढण्यात आला.  

शहरात जयंती निमित्त शिवराज दाढेल यांच्या नेतृत्वाखाली जुन्या  शहरातील गोरोबा काका मंदीर नवी आबादी येथे अभिवादन सभेचे  आयोजन करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे उद्घाट माजी  आमदार रोहिदास चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला भाजपा प्रवक्ते एकनाथ पवार, गटनेते करिम भाई शेख, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार माजी उपनगराध्यक्ष ,छत्रपती धुतमल नगरसेवक. नगरसेवक बबन निर्मले,संभाजी  चव्हाण,नबी शेख,संदिप दमकोंडवार, प्रा राजेश ढवळे, विविध संघटनांचे,पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दाढेल यांनी आभार प्रा.माधव भिसे यांनी मानले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी