उस्माननगर। उस्माननगर पोलिस स्टेशनच्या वतीने स्टेशनच्या प्रांगणात आगामी काळात होणाऱ्या पोळा सण व गणेशोत्सव सह अन्य सणाच्या निमित्ताने सपोनि पी.डी.भारती यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीला उस्माननगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावातील पोलिस पाटील , गणेश मंडळांचे पदाधिकारी ,पोळा सणांचे माणकरी , नागरिक, पत्रकार उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गावातील पोलिस पाटील , नागरिकांनी गावाविषयी मनोगतातून माहीती निर्दशनास आनून दिली . अनेक पोलिस पाटील , नागरिकांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सपोनि श्री.भारती म्हणाले की , गणेश मंडळांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, पदाधिकार्यांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन केले पाहिजे , अंगलट येईल असे कोणी काही करू नये , तसेच पर्यावरण पुरक गणेश उत्सव उत्साहात साजरा करा.असे आवाहन केले.यावेळी सपोउपनिरीक्षक सु.पल्लेवाड , ग्रामसेविका सो.शिंदे-माने ,देवरावजी सोनसळे, व्यंकटराव पाटील घोरबांड, मारोतराव पाटील बामणीकर ,विश्वभंर मोरे ( पोलिस पाटील) संजय वारकड ,बाबू घोरबांड , यांच्या सहीत पत्रकार ,सर्व गावची पोलिस पाटील , गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षक राहुल सोनसळे यांनी केले.शांतता समितीच्या बैठकीसाठी सलीम शेख ,सह होमगार्ड,पोलिस कर्मचारी, ठाण्यातील सेवक यांनी परिश्रम घेतले.