अवैध दारूबंदीसाठी तुम्ही लेखी तक्रार द्या पाठपुरावा मी करतो - माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर -NNL


हिमायतनगर,अनिल मादसवार।
शहरासह ग्रामीण भागात विनापरवाना अवैद्य रित्या देशी दारू विक्रीचा गोरखधंदा राजरोसपणे चालविला जात आहे. असे असतानाही त्या त्या भागातील बीट जमादार या धंद्याला रोखन्या ऐवजी अभय देत आहेत. किमान सण उत्सवाच्या काळात तरी या धंद्याला आवर घालून होणारे वादविवाद थांबवून उत्सव शांततेत होण्यासाठी प्रयत्न करावे. अशा प्रकारची विनंतीवजा सूचना हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दि.25 ऑगस्ट रोजी हिमायतनगर पोलीस ठाण्याला भेट दिल्यानंतर पोलीस निरीक्षक भुसनूर यांच्याकडे केली.


या चर्चेच्या वेळी व्यसनमुक्ती कडून धार्मिक प्रगतीकडे जात असलेल्या बोरगडी गावचे माजी सरपंच संजय काईतवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अनुसरून ते बोलत होते. नुकतीच हिमायतनगर पोलीस ठाण्यात सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये अवैध दारू विक्री चा प्रश्न चांगलाच गाजला असून ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर यांनी उपस्थित केलेल्या अवैध दारू विक्रीच्या प्रश्नाला सिरंजनीचे सरपंच प्रतिनिधी पवन करेवाड, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य समद खान, आदींसह अनेकांनी पाठिंबा देत हिमायतनगर पोलिसांनी भांडण तंट्याला कारणीभूत ठरत असलेल्या अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते.

त्यानंतर आज हिमायतनगर येथे हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सायंकाळी 5 वाजता भेट दिली होती. यावेळी त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील घडामोडीवर चर्चा केली. त्यांच्यासोबत असलेले संजय काईतवाड यांनी धार्मिक कार्यक्रमाला पोलीस नियम दाखवतात मग अवैध दारू विक्री होत असताना सूचना देऊनही कार्यवाही का..? केली जात नाही असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावरून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पोलीस निरीक्षक बिडी भुसनुर यांना धारेवर धरत नांदेड जिल्ह्यात हिमायतनगर हे प्रथम क्रमांकवर आले असून, गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये केंद्रबिंदू झाले आहे. या ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध धंद्याने कळस गाठला आहे किमान आपल्या कर्तव्याला लक्षात ठेवून तरी सुरू असलेल्या अवैध धंद्यावर अंकुश लावावा.

खरे पाहता नागरिक म्हणून आपली सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे आपण केवळ तोंडी सूचना देऊन मोकळे होतो. त्यामुळे यात पोलिसांचे फावते आहे अवैध दारू संदर्भामध्ये नागरिकांनी व महिला मंडळांनी पोलिसांना लेखी तक्रार द्यावी. त्यानंतर पोलिसांना कार्यवाही करणे भाग पडते. तक्रारीवरून काय कार्यवाही झाली ते आपणास समजून येईल. एकाच दारू विक्रेत्यांवर दोन वेळा कार्यवाही झाली तर पोलीस ठाण्याला जबाबदार धरून पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही होते असा नियम व कायदा आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी तोंडी न सांगता अवैध दारूच्या संदर्भामध्ये लेखी तक्रार द्यावी. त्यानंतर कार्यवाही होऊन दारूबंदी करणे शक्य होईल तक्रारी दिल्यानंतरही दारूबंदी होत नसेल तर त्या बाबतीत मी स्वतः पाठपुरावा करेल असेही त्यांनी यावेळी नांदेड न्यूज लाईव्ह बोलताना सांगितले. यावेळी जेष्ट कार्यकर्ते राम नाईक राठोड, बळीराम देवकते, माजी नगरअध्यक्ष कुणाल राठोड, गजानन चायल, सावन डाके, संजय काईतवाड, प्रकाश रामदिनवार, विलास वानखेडे, अनिल भोरे, नागेश शिंदे, वैभव डांगे, जितू सेवनकर, यांच्यासह मोठया प्रमाणात गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी