सेवानिवृत्त सैनिक व जेष्ठ शिक्षीका यांच्या हस्ते विष्णुपुरी येथे ध्वजारोहण..NNL


नविन नांदेड।
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा ऊपकम अंतर्गत १४ आगसष्ट रोजी विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालय येथे सेवानिवृत्त सैनिक विठ्ठलराव हंबर्डे तर पशुवैद्यकीय दवाखाना येथे सेवानिवृत्त सैनिक बालाजी राव हंबर्डे व जिल्हा परिषद हायस्कूल येथे जेष्ठ शिक्षीका उज्ज्वला जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अनोखा उपक्रम राबविला गेला. वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शिक्षीका उज्ज्वला जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी संतोष हंबर्डे यांंना शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त १४ आगसष्ट रोजी विष्णुपुरी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तर हार घर तिरंगा ऊपकम अंतर्गत ग्रामस्थांनी आप आपल्या निवासस्थानी झेंडे लावले होते.

१४ आगष्ट रोजी सकाळी विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालय येथे संरपच सौ. संध्या विलास हंबर्डे यांनी महामानव यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले तर सेवानिवृत्त सैनिक व विठ्ठलराव हंबर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर पशुवैद्यकीय दवाखाना विष्णुपुरी येथे सेवानिवृत्त सैनिक व ग्रामस्थ बालाजी वआंनदराव हंबर्डे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे जेष्ठ शिक्षीका उज्ज्वला जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य साहेबराव हंबर्डे, यावेळी माजी संरपच राजु हंबर्डे,ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रतिनिधी संतोष बारसे,चांदु वाहुळकर,सचिन हंबर्डे,प्रविण हंबर्डे,ग्राम विस्तार अधिकारी संजय कानोडे, कर्मचारी संतोष हंबर्डे,लिपीक उग्रसेन हंबर्डे,काळबा अंधारे,गिरजाबाई अंधारे, अंगणवाडी ताई,कर्मचारी, पशुवैद्यकीय दवाखाना विष्णुपुरी डॉ. व्हि,एन,पललेवाड,  कर्मचारी मोरे यांच्या सह जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामसथ मोठया संख्येने उपस्थित होते. १४ आगसष्ट चा ध्वजारोहण सेवानिवृत्त सैनिक व जेष्ठ शिक्षीका यांच्या हस्ते करून एक अनोखा उपक्रम राबविला या ऊपकमाचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी