लोहा तहसील कार्यालयात.. नेत्रदीपक ....अविस्मरणीय ..सजावट... देखणा सोहळा -NNL

स्वातत्र्यांचा अमृत महोत्सव●तहसीलदार टीम  मुंडे ची  उत्कृष्ट कामगिरी


लोहा|
स्वातत्र्यांचा अमृत महोत्सव ..लोहा तालुक्यात ..महसूल ... शिक्षण ..विभाग.. पंचायत समिती ..यांनी वेगवेगळ्या उपक्रमातून ..साजरा केला..स्वातंत्र्य दिना निमित्ताने..लोहा तहसील कार्यालयात ..आकर्षक ..आणि तिरंगी ..सजावट ..टाकून पाहून टाकाऊ..आपत्ती व्यवस्थापन देखावा.. अधिकारी.. कर्मचारी ..याचे  आकर्षक फेटे..त्याचा उत्साह..स्वातत्र्य सैनिक ..शहिद जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान..विद्यार्थ्यांचे  विविध कलागुण दर्शन....त्याच्या पाठीवर शाबासकी ..आणि  नेत्रदीपक परिसर ..पाहता ७५ वा स्वातंत्र्य दिन अविस्मरणीय ठरला..तहसीलदार व्यंकटेश मुंडे व टीमने केलेली मेहनत अभिनंदनिय ठरली..


लोहा तहसील कार्यालयातील १५ ऑगस्ट चा म्हणजे आजादी का अमृत महोत्सव यंदा खास आकर्षक व अविस्मरणीय ठरला.गेल्या तीन दिवसा पासून तहसीलदार व्यंकटेश मुंडे व त्याच्या टीमने कार्यालय व परिसरात सजावट केली .राष्ट्र ध्वजा रोहनला येणाऱ्या प्रत्येकांना हा परिसर आणि सजावट पाहून सेल्फी चा मोह आवरता आला नाही.कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी, ककार्यालयातील सर्व कर्मचारी, पेशकार, नायब तहसीलदार , व स्वतः तहसीलदार यानी एकजुटीने  टेक्निल वापरत  अतिशय उत्तम अशी सजावट केली.टाकाऊचा टिकाऊ  वापर करीत आपत्ती व्यवस्थापन इव्हेंट तयार केला.


स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने कारेगाव व सोनखेड येथील तलावावर भव्य असा ध्वज उभारण्यात आला आणि तेथे राष्ट्र ध्वज फडकविण्यात आला तसेच  हर घर तिरंगा साठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी तालुक्यातील  सर्व विभाग प्रमुखाची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या.स्वतः तहसील कार्यालय..शिक्षण विभाग...पंचायत समिती या विभागाने" हर घर झेंडा" अभियान तालुक्यात यशस्वी केले. तालुका स्तरावर लोह्याच्या कार्यक्रम जिल्ह्यात अव्वल होता .तहसीलदार मुंडे यांच्या सुविद्य पत्नी वर्षाताई मुंडे चिरंजीव वरद, चिरंजीव विवेक असा परिवार या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होता त्यांच्या साठी हा दिवस अविस्मरणीय ठरला. तहसीलदार मुंडे यांचे मित्र मिर्झा इस्माईल शेख हे या सोहळ्यासाठी अगत्याने उपस्थित होते.


स्वातत्र्य दिनी स्वातंत्र्य सैनिकांचा त्याच्या वारसाचा तसेच शहिद जवानांच्या पत्नीचा या ऐतिहासिक दिनी तहसील कार्यालयाच्या वतीने  सन्मान करण्यात असला .तहसीलदार मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.शाळकरी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण दर्शन सादर केले.त्यांना प्रमाणपत्र देण्यात आहे.नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसीलदार मोकले, तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती कदम व त्यांची टीम तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी महसूल संघटनेचे अध्यक्ष मोहिजे-पटणे व त्यांची टीम , यांच्या संकल्पनेतून साकारलेले विविध कलाकृतीमुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अविस्मरणीय ठरला.

या अविस्मरणीय सोहळ्यासाठी युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर,बिडिओ शैलेश वाव्हूले, माजीशिक्षण  सभापती संजय पाटील कऱ्हाळे, माजी नगराध्यक्ष किरण वटटमवार, उपनगराध्यक्ष दता वाले, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल,माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, संभाजी चव्हाण,  मुख्याधिकारी पेंटे नायब तहसीलदार राम बोरगावकर, नायब तहसिलदार संजय भोसीकर, नायब तहसीलदार अशोक मोकले, बिईओ रवींद्र सोनटक्के, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, सामाजिक वनीकरण अधिकारी काळे,सा बा  उपअभियंता मोहन पवार, तालुका कृषी अधिकारी पोटपल्लेवार , सेवानिवृत्त कृषी अधिकारी माणिकराव मुकदम, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिनेश तेललवार, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, खविसं उपसभापती श्याम पाटील पवार,  यासह मोठ्या संख्येने राजकीय सामाजिक व्यापारी पत्रकार शिक्षण क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी