नांदेड। भारताच्या आजादीच्या अमृत (७५ वर्ष) महोत्सवानिमित्त अल ईम्रान प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने आयोजीत एक शाम आजादी के नाम देशभक्तीपर व बाॕलीवुड फिल्मी गितांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दि.२९ आॕगस्ट २०२२ सोमवारी संध्याकाळी ६ वाजता कुसुम सभागृह येथे आयोजीत करण्यात आल्याची माहिती संयोजक तथा अल ईम्रान प्रतिष्ठानचे ईंजि.ईम्रान खान पठाण,एम.डी.जमाल यांनी दिली.
दरवर्षी १५ आॕगस्ट,२६ जानेवारी,१७ सप्टेंबर,१ मे ला अल ईम्रान प्रतिष्ठानच्या वतीने देशासाठी बलीदान दिलेल्या सैनिकांच्या आठवणीत देशभक्तीपर गितांचा सांस्कृतिक कार्यक्रम,स्वातंत्र्य सैनिकांचा सम्मान यासह कला,क्रिडा आदि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.आपला भारत देश स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरा केला असून या आजादीच्या अमृत महोत्सवानिमित्त गुरुवारी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड दक्षिण चे आ.मोहनअण्णा हंबर्डे,नांदेड उत्तर चे आ.बालाजी कल्याणकर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय कबाडे,गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर,पोलीस निरिक्षक भगवान धबडगे,सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र चव्हाण,अखिल भारतिय मराठी पञकार परिषदेचे विभागिय सचिव प्रकाश कांबळे,अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष निखिलभाऊ लातूरकर,युवा नेते वाजेद अन्सारी,अॕड.गजानन पिंपरखेडे,सहशिक्षक सुभाष मद्देवाड आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सांस्कृतिक कार्यक्रमात फ्रेंडस म्युजीकल ग्रुपचे मोजम पठाण,सय्यद जमिल,एम.डी.जमाल,एम.डी.मोईन,जमिल चाऊस,पोर्णिमा कांबळे,सौ.ललीता दुलगच,अँकर एम.डी.अन्वर आदि गायक यांचा संच या कार्यक्रमात आपली कला दाखवणार आहे.संगितप्रेमींनी व कलेवर प्रेम करणा-यांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहान संयोजक ईजि.ईम्रान खान,एम.डी.जमाल,मिर्झा आजम बेग,शेख समीर,मिलिंद सोनसले, मोहसीन खान,अॕड.नवीद खान,मोहम्मद रफीक(मुशी) यांनी केले आहे.