अपूर्व उत्साहात भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा साजरा
पुणे। लष्कर बेडा पंचायत,गुरु गोरखनाथ गोगाजी ट्रस्ट च्या वतीने आयोजित भगवान गोगादेव जन्मोत्सव बागड सोहळा शनीवारी रात्री उत्साहात पार पडला. हा सोहळा खा.डॉ.अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गोगामेडी मंदिर, पूलगेट येथे झाला.खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते जन्मोत्सवानिमित्त आरती झाली.
डॉ, सुब्रत पाल ( मुख्य कार्यकारी अधिकारी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड ), आळंदी गोरक्षनाथ मठाचे दिग्विजयनाथ महाराज, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजय भोसले (शिंदे गट ) , जांबुवंत मनोहर ( युक्रांद) , दीपक गायकवाड ( वंचित बहुजन आघाडी ) , शुभम सारवान, लष्कर बेडा पंचायतचे आणि गुरू गोरखनाथ गोगाजी ट्रस्टचे पदाधिकारी होते. सुदेश सारवान आणि कवीराज संघेलिया यांनी पंचायत आणि समिती तर्फे आभार मानले.
'वाल्मिकी समाजाचा हा उत्सव हे पुण्याच्या अनेक सांस्कृतिक वैभवापैकी एक वैभव आहे आणि ते टिकवून ठेवावे ,असे आवाहन खा. अमोल कोल्हे यांनी केले.सामाजिक अभिसरणाच्या दृष्टीने छोट्या-मोठ्या समाजांच्या उत्सवांमध्ये सर्वांनी एकत्र येऊन ऐक्य निर्माण करावे ,भारत हा विविधता असणारा देश आहे. हे वैविध्य आपल्याला अशा उत्सवांमधून दिसून येते. तळागाळात काम करणाऱ्या आणि संख्येने छोट्या असणाऱ्या समुदायांच्या उत्सवांमध्ये आपण विशेष करून सहभागी झाले पाहिजे आणि प्रोत्साहन दिले पाहिजे ',असेही ते म्हणाले.