४० व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन
पुणे। भालचंद्र ज्योतिर्विद्यालय आणि प्रा.रमणलाल शहा ज्योतिष अॅकॅडमी आयोजित ४० व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी सकाळी पुण्यात झाले.
उद्यान प्रसाद मंगल कार्यालय येथे हे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. २० संस्थांचा या अधिवेशनाच्या आयोजनात सहभाग आहे.देशभरातून नामवंत ज्योतिर्विद या अधिवेशनात सहभागी आहेत.
उद्योजक अप्पासाहेब नवले यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले.आदिनाथ साळवी अध्यक्षस्थानी होते. पं.राजेश वशिष्ठ (चंदीगढ ),कैलास केंजळे ( पुणे ), उद्योजक राजकुमार राठोड , संयोजक नवीनकुमार शहा , स्वागताध्यक्ष डॉ. प्रसाद जोशी, विजय जकातदार, चंद्रकला जोशी, पुष्पलता शेवाळे , डॉ. जयश्री बेलसरे, डॉ. मधुसुदन घाणेकर उपस्थित होते. चंद्रकांत( दादा ) शेवाळे यांनी प्रास्ताविक केले.अॅड. वैशाली अत्रे, गौरी केंजळे यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पलता शेवाळे यांनी आभार मानले.
उद्घाटन सत्रात चंद्रकांत ( दादा ) शेवाळे, सौ.पुष्पलता शेवाळे यांचा सत्कार प्रा.रमणलाल शहा, आदिनाथ साळवी यांनी केला. अष्टकवर्ग ज्योतिष ( प्रदीप पंडित ), ग्रह ज्योतिष ( श्री.आंबेकर ), क्रिस्टलची अद्भुत दुनिया ( गौरी केंजळे ), अष्टक वर्ग -अचूक फलादेशाचा मार्ग ( ज्योती जोशी ), बोटांचे ठसे व व्यक्तीमत्व (अॅड. प्रफुल्ल कुलकर्णी ),मंत्रशास्त्र या पुस्तकांचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या अधिवेशनात ज्योतिष विषयक विषयांवर देशभरातील तज्ज्ञांची चर्चासत्रे, प्रदर्शन, स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. उद्घाटन कार्यक्रमात बोलताना राजकुमार राठोड म्हणाले, 'विचार सकारात्मक ठेवले तर नशीब साथ देते. ज्योतिषांनी ज्योतिष सांगताना फार गंभीर चेहरा करू नये.ज्योतिषांनी सर्वांच्या चेहऱ्यावर खुशी आणण्याचे काम करावे. पं. राजेश वशिष्ठ म्हणाले, ' देवदेवतांची आपण साधना करू शकतो, पण कोणीही सिध्दी मिळवू शकत नाही, हे लक्षात घ्यावे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आदिनाथ साळवी म्हणाले, ' ज्योतिष हे गहन शास्त्र आहे. एका ज्योतिष पध्दतीनुसार काढलेला निष्कर्ष दुसऱ्या पध्दतीत बदलू शकतो. सर्व पध्दतींचा अभ्यास केला तरी, एकाच ज्योतिष पध्दतीवर लक्ष केंद्रीत करावे.ज्योतिष अभ्यासकांनी ज्योतिषशास्त्राची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी कार्यरत राहावे.
उद्घाटनानंतर साडेअकरा ते दीड वेळात झालेल्या सत्रामध्ये डॉ. भरतभाई खंडेदिया ( वास्तू रेमिडियल ), पं. सागर ( पंचपक्षी ), प्रा.अशोक भाटिया ( वैदिक अंकशास्त्र ), पं. गणेश दुबे ( मंत्र शास्त्र ), डॉ. किर्ती शहा ( वास्तू आणि एनर्जी ) सहभागी झाले. डॉ. सुहास डोंगरे या सत्राच्या अध्यक्षस्थानी होते.
तिसरे सत्र २ ते ४ या वेळेत झाले. राजेश वशिष्ठ ( माँ बगलामुखी मंत्र निवारण ), ज्योतिषाचार्य उमेश घीवाला ( सायंटिफिक वास्तू ), आचार्या भावना भाटिया ( लाल किताब ), डॉ. राघव भट ( कंबाला ज्योतिष ) सहभागि झाले. डॉ. सर्वेश गुप्ता अध्यक्षस्थानि होते. चौथे सत्र ४.१५ ते ५.३० या वेळेत झाले.डॉ. कल्पना शमी ( वास्तू ), आचार्या डॉ.हिना ओझा ( वास्तू ), आचार्या डॉ.मीतालि जानी ( ज्योतिष ) , डॉ. सुकेश त्रेतिया ( लाल किताब और वास्तू ) सहभागी झाले. अध्यक्षस्थानी डॉ. त्रिशला शेठ होत्या.
दुसऱ्या दिवशीही भरगच्च कार्यक्रम
रविवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन सकाळी ९ वाजता होणार आहे. डॉ. दत्तप्रसाद चव्हाण अध्यक्षस्थानी असतील. उद्घाटन ज्योतिष गुरु पं. कुंवर हे करतील. डॉ. जयश्री बेलसरे स्वागताध्यक्ष असणार आहेत. डॉ. वा.ल. मंजुळ, अॅड. डॉ. सुनीता पागे, उद्योजक बी.जी. पाचारणे, उद्योजक अप्पासाहेब नवले यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पहिले सत्र १० ते साडेअकरा या वेळेत असणार आहे. ज्योतिषाचार्य विजय जकातदार हे अध्यक्षस्थानी असतील.यामध्ये श्रीमंत जयंत झरेकर ( मंत्रशास्त्र ), वेदमूर्ति विवेक शास्त्री गोडबोले ( समस्या निवारण ), वरदविनायक खांबेटे( पाच तत्वांचा फलितासाठी वापर ), डॉ.आरती घाटपांडे ( उपचय स्थाने ), रमेश पलंगे ( वास्तूशास्त्राप्रमाणे घराची अंतर्गत रचना ) सहभागी होतील.
दुसरे सत्र दुपारी ११.३५ ते १२.४० या वेळेत होणार आहे. या सत्राचे अध्यक्ष ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार असतील. डॉ. विकास खिलारे ( विवाह ), डॉ. प्रसन्न मुळये ( आधुनिक विवाह गुण मेलन ), अॅड. प्रफुल्ल कुलकर्णी (हाताच्या बोटाच्या ठशावरून व्यक्तीमत्व ), सुनीला जानी पवार ( जन्म आणि कर्मबंध ) हे सहभागी होणार आहेत.
तिसरे सत्र दुपारी १२.५५ ते १.४० या वेळात होणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय रागरंग ' असा या सत्राचा विषय आहे. या सत्राचे अध्यक्ष डॉ. सुहास डोंगरे असतील. डॉ. उदयराज साने, डॉ.मधूसुदन घाणेकर सहभागी होणार आहेत. चौथे सत्र दुपारी २.३० ते ४ या वेळेत होणार आहे.डॉ. चित्रा दीक्षित या सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. डॉ.पूनम पाटील ( ग्रहांचे गोचर ), शुभांगिनी पांगारकर ( वास्तूंमधील एनर्जी ), डॉ. प्रदीप पंडित ( अष्टक वर्गावरुन राशीभविष्य ) हे सहभागी होणार आहेत.
पाचवे सत्र सायंकाळी ४ .१५ते ६.३० दरम्यान होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. स्मिता गिरी असणार आहेत. डॉ. संजीवनी मुळये ( ग्रह आणि सौंदर्य ), भरत सटकर ( फोर स्टेप थिअरी ), डॉ. रजनी साबदे ( नक्षत्र ) , डॉ. किशोरी रेखा टाक ( हस्तरेखा ) हे सहभागी होणार आहेत. ५.३५ ते ६.३० या वेळेत मला उमजलेले ज्योतिष ' या विषयावर ज्योतिषीय सूत्र स्पर्धा होणार आहे. नंतर अधिवेशनाचा समारोप होईल. डॉ. अरुण हुपरीकर अध्यक्षस्थानी असतील.पंडीत सवाई सहभागी होतील.