भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे। भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' दिशा ' या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, २० ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी भारतीय विद्या भवनच्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृह(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले होते. यामधे डॉ. अरूधंती श्रीनिवासन (चेन्नई ), रमा क्षीरसागर (चेन्नई ) , तेजस्विनी हलथोरे ( बेंगलोर ) यांनी बहारदार नृत्य प्रस्तुती सादर केली.
रमा क्षिरसागर ( चेन्नई ) यांच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.पदम , किर्तनम् आणि अभिनय या नृत्य प्रस्तुती त्यांनी सादर केल्या.यानंतर डॉ. अरूधंती श्रीनिवासन ( चेन्नई ) यांनी पंचाक्षर स्तोत्रम, यती - राग ताल मालिका , अष्टपदी या प्रस्तुती सादर करून रसिकांची मने जिंकली. कार्यक्रमातील शेवटची प्रस्तुती बेंगलोरच्या तेजस्विनी हलथोरे यांनी केली. वृक्षांजली , देवरनामा, पदम ,तिल्लाना या बहारदार नृत्यरचना त्यांनी सादर केल्या.मेघना साबडे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. अनघा हरकरे यांनी सूत्रसंचालन केले.
महाराष्ट्राबाहेरील युवा कलाकारांना नृत्य सादर करण्याची संधी मिळावी या उद्देशाने मेघना साबडे यांच्या ' नृत्ययात्री ' या संस्थेने पुढाकार घेतला होता.हा कार्यक्रम विनामूल्य होता.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १३६ वा कार्यक्रम होता.