नांदेड। दिव्यांग व्यक्तीना सन २०२१-२२ चा केंद्रिय राष्टिय पुरस्कार जास्तीत जास्त दिव्यांगाना माहिती व्हावी म्हणुन दिव्यांग आयुक्त पुणे यांचे पत्र दि १८ जुलै २०२२ च्या पत्रानुसार दिव्यांगाना माहिती व्हावी म्हणुन लोकल वर्तमानपत्रात प्रसिध्द देण्याबदल आदेश दिले तरी त्या पत्राची संबधित अधिकारी दखल घेतली नाहि.
दि.२६ जुलै २०२२ रोजी दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्याकडे लातुरच्या कार्यकर्तृयाकडुन माहिती मिळताच पुरस्काराची माहिती दि २६ जुले २०२२ रोजी मिळाल्या बरोबर समाज कल्याण येथील गोडगोलवार यांच्याकडे पुरस्कार प्रस्ताव बदल माहिती विचारली असता मला पत्र मिळाले नाहि आल्याबरोबर माहिती पाठवितो असे ऊतर दिले .
मी सतत दि् २६ जुलै २०२२ ते २२ ऑगस्ट पर्य़त पाच वेळा दिव्यांग विभागातील वैधकिय.सामाजिक कार्यकर्ता गोडगोलवार यांना माहिती विचारली कि फार्म कसे भरायचे त्याची माहिती मागतिली असता मी पुण्याहुन घेऊन देतो म्हणुन मला माहिती देण्यास टाळाटाळ केली असता मी तिन वेळा दिव्यांग कक्ष जि.प. यांना तोंडी तक्रार केली. दि.२२ ऑगस्ट २०२२ रोजी मा.ठोमरे साहेब,
ऊपमुख्यकार्यकारी सामान्य जि् नादेड सराना भेटून तोंडी तक्रार केली असता त्यांनी समाजकल्याण अधिकारी यांना फोनवर मदत करण्याचे आदेश दिले तेंव्हा गोडगोलवार यांनी मेल आयटिचे पत्र दिले. ते मेलवर फार्म ओपण होत नसल्यामुळे मी मा देशमुख साहेब दिव्यांग आयुक्त पुणे यांना फोनवर ऑनलाईन फार्म भरता येत नाहि व समाज कल्याण नांदेड येथे किंव्हा जिल्हाअधिकारी कार्यालयाकडुन मदत घेण्याची सांगितले .दि २३ ऑगस्टला २०२२ रोजी मी दिवसभर अनेक ऑनलाईन सेंटरला गेले असता माझा फार्म ऑनलाईन सेंटरला करता आले नाहि.
नांदेड येथील गोडगोलवार यांनी मी केलेल्या पुरस्कारासाठी गतवर्षि वेळेत दिलेला पुरस्कार प्रस्ताव सुध्दा पाठविला नव्हता. मी त्याच वेळी तक्रार दिली होती. त्यावेळी समाज कल्याण अधिकारी कुंभरगावे सरासमोर चुकीबदल माफी मागितली होती. दिव्यांगाच्या कामात कसुर करणाऱ्या दिव्यांगाना सवलतीपासुन हक्कापासुन वंचीत ठेवणा्ऱ्या दोषी अधिकारी यांची चौकशी करून न्याय द्यावा. न्याय नाहि मिळाल्यास दिव्याग संघटनेच्या वतीने तिर्व आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे यांनी दिव्यांग आयुक्त पुणे, मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.नांदेड जिल्हाअधिकारी नांदेड,समाजकल्याण अधिकारी ई निवेदनाद्वारे दिला.
