राष्ट्रीय खुल्या क्रीडा स्पधैत भाग्यश्री जाधवने पटकावले सुवर्णपदक -NNL


नांदेड।
येथील अष्टपैलू आंतरराष्ट्रीय  दिव्यांग खेळाडू तथा नांदेडची भुमीकन्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन पॅरा ऑलिंम्पिक क्रीडा स्पर्धेत गोळाफेक  या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाऊन  सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

 नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज  येथील रहिवासी असलेल्या भाग्यश्री जाधव हिने  दिव्यांगांच्या जिल्हा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धेत पदकांची लयलूट केली.दुबई येथे झालेल्या फाजा  चॅम्पियनशिप व चीन येथे झालेल्या ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेत तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.त्यानंतर गतवर्षी टोकियो येथे झालेल्या पॅरा ऑलिंम्पिक  क्रीडा स्पर्धेत भारतीय संघात भाग्यश्री जाधव हिची निवड झाली होती. या स्पर्धेत सहभागी होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू होती. तिने या स्पर्धेत जागतिक पातळीवर सातवे स्थान प्राप्त केले आहे.   

आपल्या सामान्य परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत व प्रचंड जिद्दीच्या जोरावर तिचा कीडा प्रवास सुरूच आहे. कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या चौथ्या इंडियन नॅशनल ओपन चॅम्पियनशिप क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत तिने गोळाफेक  या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकाऊन  सुवर्णपदकाची ती मानकरी ठरली. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.हा क्रीडा प्रवास सुरू असतानाच तिने शिक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष केले नसून एम. ए. बी. एड ही पदवी संपादन करून ती सध्या कंधार येथील श्री शिवाजी लॉ कॉलेज तेथे विधी शाखेचे शिक्षण घेत आहे.

 या यशाबद्दल बोलताना भाग्यश्री म्हणाली की,आपल्या संपुर्ण क्रीडा  प्रवासासाठी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव प्रकाश कांबळे, भाजप दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तथा हिंगोलीचे माजी नियोजन अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर,  मुख्य प्रशिक्षक एस. सत्यनारायण( बेंगलोर) बेसिक ट्रेनर श्रीमती पुष्पा मॅडम(बेंगलोर), विवांश जिमचे अनिल पाटील भालेराव, मातोश्री मुलींच्या वसतीगृहाचे सुधीर पाटील, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे,  मराठा सेवा संघ, दिव्यांग कृती समिती, साई परिवार, राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे, पोलीसचे डी.आय. शेरू मास्तर, शशीकांत पाटील बेळीकर, सविता पतंगे व उपचार करणारे सर्व डॉक्टर यांचे नेहमी सहकार्य लाभते. आगामी एशियन, वर्ल्ड चॅम्पियनशिप क्रिडा स्पर्धेत सहभागी होण्याचा माझा मानस असून त्यादृष्टीने मी प्रयत्नशील असून कठोर मेहनत घेत आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी