जनशक्ती संघटनेची आढावा बैठक नांदेड येथे संपन्न -NNL


नांदेड।
महाराष्ट्रात प्रभावशाली संघटना म्हणून नावारूपास येत असलेल्या आणि संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या जनशक्ती संघटनेची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे या संघटनेची आढावा बैठक नांदेड येथे पार पडली.

 दिनांक १९/०८/२०२२ रोजी जनशक्ती संघटना नांदेड जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह नांदेड येथे जनशक्ती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री उमाकांत पाटील तिडके यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा संपर्कप्रमुख श्री प्रभाकर लखपत्रेवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यामध्ये आपली संघटना जिल्हाभरामध्ये कशी वाढवावी या विषयावर अनेकांची मते जाणून घेण्यात आली. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी अनेक समस्या मांडल्या त्या समस्याचे निवारण जिल्ह्याचे प्रमुख श्री बाळू पाटील शिरफुले व श्री शंकर सिंह ठाकुर यांनी केले. तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना गाव तिथे शाखा करण्याचे आदेश देण्यात आले व ते आदेश सर्वांनी मान्य देखील केले. सदरील बैठक खूपच हसीखेळीच्या वातावरणात पार पडली.

 बैठकीनंतर जनशक्ती संघटना नांदेड कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी प्रेमदास वळसंगकर यांची निवड करण्यात आली तर जनशक्ती संघटना नांदेड महिला आघाडीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ.चैताली रणवीर यांची निवड करण्यात आली. यावेळी उमाकांत पाटील तिडके, प्रभाकर लखपत्रेवार, बाळू पाटील शिरफुले, शंकर सिंह ठाकुर,मारोती शिकारे, दिनेश जाधव, सौ. विद्या वाघमारे, सौ.रजनी मेडपल्लेवार, श्रीराम पाटील टेकाळे, केशव बुवा बन, मारोती बिजले, निखिल परचाके, राहुल पोलासवार, हुसेन दाऊद शेख, दशरथ प्रधान, लालेस बिजापुरे, दशरथ राठोड, कोंडीबा ढगे, केशवराव शिरफुले इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी