नांदेड। मराठवाडा मुक्ती संग्रामात अप्रत्यक्ष भूमिका बजावणाऱ्या सुभद्राताई बाबुराव मोरे यांचे नुकतेच वयाच्या 90 व्या वर्षी दुःखद निधन झाले.
त्यांचे अंतिम संस्कार त्यांच्या मूळगावी टेळकी तालुका लोहा जिल्हा नांदेड येथे टेळकी परिसरातील प्रमुख गावकारी यांच्या उपस्थितीत झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, नातू,नातवंड,सुना असा परिवार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील निवृत्त प्राध्यापक अनिल बाबुराव मोरे यांच्या ते मातोश्री होत.
