नवीन नांदेड। वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्चाला फाटा देत वाढदिवसाचे औचित्य साधून नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सहसचिव अनिल धमने यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजीक बांधीलकी जोपासत गोपाळ चावडी येथील स्मशानभूमी व आरोग्य केंद्र तुप्पा व वाघाळा येथिल संतोष कन्या प्राथमिक शाळा ,सिडको वृत्तपत्र विक्रेते यांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या ऊपकमाचे अनेकांनी अभिनंदन केले.
सामाजिक क्षेत्रात व राजकारण मध्ये अग्रेसर असलेल्या गोपाळ चावडी ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनिल धमणे यांनी आपल्या वाढदिवसाच्ये औचित्य साधून २४ आगसष्ट रोजी गोपाळ चावडी स्मशानभूमी व तुप्पा आरोग्य केंद्र जवाहरलाल नगर येथे वृक्षारोपण व रूग्गनां फळे वाटप केले तर सिडको येथील वृत्तपत्र विक्रेते संघटनेचे टिन शेड येथे परिसरातील वृत्तपत्र विक्रेते यांच्या पाल्यांना व हडको येथील संतोष प्राथमिक शाळा हडको व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळ चावडी येथील विद्यार्थी यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वही,पेन,व सचित्र बालमित्र पुस्तके वाटप केले.
यावेळी बळीरामपुर जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते जिवन पाटील घोगरे ,माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे, माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच साहेबराव सेलुकर ,जेषठ नागरीक शंकर धिरडीकर, श्रीनिवास कुलकर्णी , बळीरामपुर ग्रामपंचायत चे माजी सरपंच नागोराव अंबटवार, उपसरपंच प्रतिनीधी राजेश वाघमारे, ग्राम पंचायत सदस्य प्रतिनिधी संजय सोनकांबळे , गणेश जिंदम ,गोपाळचवडी ग्रामपंचायत प्रतिनिधी सदस्य रमेश तालीमकर , गुलाब ठाकुर , सुभाष माचनवाड ,विठ्ठल बेजगमवार, दिगांबर, यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.तर नविन नांदेड मराठी पत्रकार संघाच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
