लोहा| प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे व नांदेड जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मातंग समाजाचे युवा नेतृत्व, दैनिक साहित्य सम्राट चे तालुका प्रतिनिधी तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवराज दाढेल यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरातील गोरोबा काका मंदीर नवी आबादी येथे अभिवादन सभेचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक रोहिदास चव्हाण (माजी आमदार लोहा-कंधार) तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष गजानन सावकार सुर्यवंशी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक एकनाथ दादा पवार यांच्यासह करिम भाई शेख गटनेते तथा नगरसेवक न.पा., प्रमुख उपस्थिती प्रा.राजेश ढवळे उद्योजक नांदेड यांसह माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार, नगरसेवक बबन निर्मले,संभाजी पाटील चव्हाण,नबी शेख,संदिप दमकोंडवार, यांसह सर्व नगरसेवक, विविध संघटनांचे,पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकत सद्यस्थितीतील समाजाचे वास्तव चित्रण दाखवून देत बदल घडवून आणण्यासाठी नवयुवकांसमोर आव्हान असल्याचे बोलून दाखवले. उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सदरिल आयोजक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लोहा तालुका प्रसिद्धी प्रमुख शिवराज दाढेल यांचे सर्वांनी तोंडभरून कौतुक केले.यासाठी सदैव भक्कमपणे पाठीशी असल्याचे प्रमुख वक्ते प्रा.राजेश ढवळे सह सर्व मान्यवरांनी बोलून दाखवले.यावेळी पत्रकार संघाचे लोहा तालुकाध्यक्ष शिवराज पाटील पवार,उपाध्यक्ष संजय कहाळेकर, कोषाध्यक्ष रमेश पवार, स्वाभिमानी भीमसेनेचे विधानसभा अध्यक्ष तथा पत्रकार विलास सावळे, दैनिक चालू वार्ता चे उपसंपादक गोविंद पाटील पवार सह अनेकांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन दाढेल यांनी तर प्रास्ताविक व आभार सुरेश दाढेल यांनी मानले.
शहराचे भुमिपुत्र माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी सद्यस्थितीतील वाढत्या व्यसनाधीनतेवर, बेरोजगारीवर, गुंड प्रवृत्तीवर,नाराजी व्यक्त करत आपल्याच जन्मभूमीतील ज्वलंत उदाहरण म्हणजे एकनाथ दादा पवार यांच्याप्रमाणे एका ड्रेस वर पुणे येथे गेलेला माणूस आज उद्योजक झाला असल्याचे आदर्शदायी, प्रेरणादायी उदाहरण देत जनसमुदायाला संबोधित केले.