नविन नांदेड। नांदेड शहराला लगत असलेल्या जागृत देवस्थान तिर्थक्षेत्र काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथे श्रावणमास निमित्ताने दुसऱ्या सोमवारी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी विधीवत पूजा करून दर्शन घेतले, यावेळी महाप्रसाद चे आयोजन भाविक भक्तांसाठी करण्यात आले.
तिर्थक्षेत्र काळेशवर विष्णुपुरी नांदेड येथे श्रावणमास दुसऱ्या सोमवार ८ आगसष्ट रोजी रात्री १२ वाजता अभिषेक व महापुजा , सकाळी महाआरती व भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती,तर नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार मोहनराव हंबर्डे,संतुकराव हंबर्डे यांच्या सह अनेक पक्षांच्या विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दर्शन घेतले.
मंदिराचे पुजारी कैलास सदाशिव धनमणे यांच्या सह धनमणे परिवाराने विधीवत व मंत्रोच्चार जयघोष मध्ये पुजा केली, तर सेवेदार गंगाधर वाघमारे यांनी सेवा बजावली, समिर गणपत मोरगे यांच्या वतीने भाविक भक्तांसाठी महाप्रसाद आयोजन करण्यात आले होते,यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, सायंकाळी गंगा आरती व काळेशवर आरती करण्यात आली.
ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुरेश थोरात विश्वजीत कासले व ५५ महिला व पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता तर नंदीघाट किना-यावर जिवरक्षक दल तैनात करण्यात आले होते.भाविक भक्तांसाठी दर्शन सोयीस्कर होण्यासाठी देवस्थान समितीचे शंकर हंबर्डे, उत्तम हंबर्डे,धारोजी हंबर्डे यांच्या सह पदाधिकारी व गावातील समन्वयक यांनी परिश्रम घेतले.