नांदेड। भारत सरकारच्या मध्य रेल्वेच्या वतिने नांदगाव व लासलगाव रेल्वे स्थानक येथे थांब्यांचा शुभारंभ आज केला. नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी व व्यावसायिकांना या सुविधेचा मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले. पुढे बोलतांना श्री दानवे यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सवाबाबत घेतलेल्या पुढाकारांवर भर दिला. प्रवाशांच्या सोयीस्कर प्रवासासाठी रेल्वे मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांबद्दलही त्यांनी सांगितले.
केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे आणि आरोग्य आणि केंद्रीय कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रविण पवार यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर काशी एक्स्प्रेस या ट्रेनच्या थांब्याला नांदगाव येथे (व्हिडिओ लिंकद्वारे) हिरवा झेंडा दाखवला. 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर काशी एक्सप्रेसला नांदगाव येथे (व्हिडिओ लिंकद्वारे) दि. १४.८.२०२२ रोजी हिरवा झेंडा दाखवून थांब्याची तरतूद सुरु केली. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी श्री अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी माननीय मान्यवरांचे, माध्यम प्रतिनिधींचे आणि प्रवाशांचे मुख्यालय मुंबई येथून व्हिडिओ लिंकद्वारे स्वागत केले. भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुल्हारी यांनी आभार मानले. कार्यक्रमास मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ लिंकद्वारे उपस्थित होते तर भुसावळ विभागातील वरिष्ठ अधिकारी नांदगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. दि. १४.८.२०२२ पासून प्रायोगिक तत्त्वावर खालील तीन गाड्यांना नांदगाव आणि लासलगाव येथे ६ महिन्यांसाठी थांबा देण्यात आला आहे.
नांदगाव येथे 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस -गोरखपूर एक्सप्रेस नांदगाव येथे ११.२९ वाजता पोहोचेल आणि ११.३० वाजता सुटेल.
15018 गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस नांदगाव येथे ११.३९ वाजता पोहोचेल आणि ११.४० वाजता सुटेल.
22177 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वाराणसी महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे ०५.०४ वाजता पोहोचेल आणि ०५.०५ वाजता सुटेल.
22178 वाराणसी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरी एक्सप्रेस नांदगाव येथे ०५.३९ वाजता पोहोचेल आणि ०५.४० वाजता सुटेल. लासलगाव येथे 11071 लोकमान्य टिळक टर्मिनस - बनारस कामायनी एक्स्प्रेस १७.३७ वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि १७.३८ वाजता सुटेल. 11072 बनारस - लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस १७.५९ वाजता लासलगाव येथे पोहोचेल आणि १८.०० वाजता सुटेल.
टीप: दि. १४.८.२०२२ रोजी पासून प्रवास (JCO) सुरू होणाऱ्या वरील सर्व गाड्यांसाठीचे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.