फिल्मी स्टाईलने गुप्तरित्या पाठलाग करुन दरोडेखोरांना केलं जेरबंद
हदगाव, शे चांदपाशा। लातुरचे जिल्ह्याचे अप्परचे पोलिस अधिक्षक याच्या मार्गदर्शनात नादेड जिल्ह्यातील हदगाव पोलिस स्टेशन विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोलिस स्टेशन पोफाळी पोलिसांनी संयुक्त गुप्तपणे दरोडखोरांच्या शोध मोहीम राबवली होती.
विदर्भातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलिस स्टेशन अंतर्गत उमखेड -मुळावा रोडवरील एका गावाच्या फाट्या जवळ ही मोहीम फत्ते झाली या या रहस्यमय घटनेची मिळालेली माहीतीअशी की, शणीवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान लातुर येथील येथील दरोड्यातील मुख्यआरोपी एका अलिशान कार मधून हदगाव व विदर्भातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी या गावात फिरत असल्याची माहीती मिळाली. त्यावरुन हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक हनुंमत गायकवाड यांच्या चाणक्ष चमुने विदर्भातील पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार याचेशी संपर्क साधून आरोपीचे पांढ-या रंगाच्या अलिशान कारचा पाठलाग सुरु केला असता सदर आरोपी मुळवा या गावाकडे भरधाव वेगाने जात होते. कळमुल फाट्याजवळ त्यांना फिल्मी स्टाईलने रोडवरच आडविण्यात आले त्यामध्ये अट्टल चार दरोखोर मिळवून आले ह्या चार दरोडेखोरांची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी राँड. फायटर, खंजीर आदी घातक अशी जीवघेणी शस्त्रे आढळून आली.
यातील आरोपीची नावे पुढील प्रमाणे आहे अविनाष शंकर देवकर (२८) रा राजीव गांधी चौक आबेजोगाई. जि बीड, सुर्यकांन्त राम मुळे (34) गाधीनगर आबेजोगाई जि बीड, सुरेश रामकिसन गंगने (38) आबेडकर चौक नेताजी रोड आबेजोगाई जि बीड व सुदर्शन विठ्ठल माने सुभाष चौक परळी जि बीड.अशी आरोपीची नावे आहेत. पकडलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्यावर विविध ठिकाणी गंभीर गुन्ह्याच्या नोदी असल्याची माहीती मिळाली विशेष म्हणजे ही संयुक्त पोलिसांची ही गुप्त कारवाई लातुर जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या कामी विदर्भातील पोलीस व मराठवाडा पोलीसांनी हायफाय दरडोखोरांना अटक केल्याने नागरिकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.