अर्धापूर, निळकंठ मदने। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने " हर घर झेंडा" उपक्रम प्रत्येक नागरीकांने आपापल्या घरावर झेंडा लावून हा उपक्रम अर्धापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात अधीकाऱ्यांनी कमी दरात तिरंगाध्वज देण्यास मंगळवारी प्रारंभ केला आहे.
अर्धापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने हर घर झेंडा उपक्रम प्रत्येक नागरीकांने आपापल्या घरावर १३ आॅगस्ट ते १५ आॅगस्ट दरम्यान तिरंगा ध्वज फडकावा यासाठी तहसीलदार उज्वला पांगरकर, गटविकास अधिकारी मिना रावताळे,कृषी अधिकारी अनिल शीरफुले, जिल्हा सचिव निळकंठराव मदने,विस्तार अधिकारी व्हि एम मुंडकर,व डॉ एस पी गोखले, सरपंच अनिल इंगोले यांची उपस्थिती होती,बचत गटाकडून कमी दरात ३० रुपयात ध्वज देण्यात आले,प्रत्येकांनी आपापल्या घरावर झेंडा लावून हा उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन अधीकाऱ्यांनी यावेळी केले. याप्रसंगी राजकुमार मदने, चंदेल,लोहकरे, ग्रामसेवक,बचत गटातील महिला यांची उपस्थिती होती.