नविन नांदेड। नांदेड कन्या,आणि प्रशासकीय पातळीवर आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत असणाऱ्या आणि त्यातून आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवणारी आपल्या सर्वांच्या भगिनी सरोज पुराणिक (देशपांडे) यांच्या कामाची ऊपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयाने दखल घेतली आहे.
पाणी पुरवठा विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजने च्या विशेष कार्य अधिकारी असलेल्या सरोज पुराणिक यांच्यी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात कक्ष अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
गेली २५ वर्ष प्रशासनात निस्वार्थ भावनेने सेवा बजावणाऱ्या सरोज च्या कार्याची अशा प्रकारे योग्य दखल घेण्यात आली आहे. सरोज पुराणिक देशपांडे या सिडको नांदेडचे रहीवासी जयंतराव पुराणिक यांच्या कन्या व ऊद्योजक संजय पुराणिक यांच्या भगिनी आहेत. त्याचा या नियुक्ती बदल मित्र मंडळ व परिवारातील सदस्यांनी अभिनंदन केले आहे.