हिंदु जनजागृती समिती आयोजित विशेष संवाद : ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास - NNL

हिंदूंनी फाळणीच्या वेळेचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे ! - अधिवक्ता सतीश देशपांडे


मुंबई|
भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू आणि शीख बांधवांना मारण्यात आले. हिंदू आणि शीख महिला, मुलींवर भयंकर अत्याचार करण्यात आले, जे शब्दांत वर्णन करू शकत नाही. स्वत:ला बुद्धिवादी आणि इतिहासतज्ञ समजणारे दोन्ही बाजूने हिंसाचार झाला, असे आतापर्यंत खोटे सांगत आले आहेत. हा हिंदू मृतकांवरील अन्याय असून इतिहासातील चूकसुद्धा आहे. हिंदूंनी फाळणीच्या वेळेचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन इतिहास व संस्कृती अभ्यासक आणि लेखक अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

अधिवक्ता देशपांडे पुढे म्हणाले की, मुस्लिम लीगच्या ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या घोषणेने दंगली घडवून, हिंदूंवर अत्याचार करुन आणि भूमी बळकावून फाळणी घडवून आणली गेली. पश्चिम बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथे श्री. गोपाल पाठा यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी केलेल्या प्रतिकारामुळे मुस्लिम लीगने त्यावेळी केलेल्या दंगली रोखल्या गेल्या; मात्र श्री. गोपाल पाठा कोण आहेत, हे आजच्या पिढीला माहितीच नाही, कारण भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू बांधवांवर झालेला अत्याचार आणि बलिदानाचा सत्य इतिहास आतापर्यंत सांगितलाच गेलेला नाही. आताच्या पाकिस्तानात असलेले लाहोर, रावळपिंडी या ठिकाणी हिंदूंच्या नृशंस हत्या, स्त्रियांवर अमानुष अत्याचार झाले. रेल्वेगाड्यांमधून हिंदूंचे मृतदेह ‘आझादी का तोहफा’ म्हणून अमृतसर आणि देशातील अन्य ठिकाणी पाठवण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाचे विभाजन होईल, याविषयी वर्ष 1942 मध्ये आपल्या भाषणातून अगोदरच सावधही केले होते, मात्र सावरकरच देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत, असा दुष्प्रचार अजूनही केला जातो. मोहम्मद अली जीना यांच्यासह मुसलमान नेत्यांनी फाळणी घडवून आणली, हे सत्य सुस्पष्टपणे सांगितले जात नाहीत, असेही अधिवक्ता देशपांडे म्हणाले. 

श्री. रमेश शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती,संपर्क : 9987966666

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी