आजच्या या आभासी जगात प्रत्येकाचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. वाढती स्पर्धा आणि हे आभासी जग यासोबत सर्वजण जोडल्या गेलो ही वस्तुस्थित आहे. सर्वच कसं गतीमान झालेलं, अशा या गतीमान चक्रव्यवस्थेत स्वतः टिकून राहणे ही काळाची जणु गरजचं बनलेली आहे. या गतीमान समाजात राहतांना परस्परांशी नातेसंबंध निर्माण होतात. या वास्तवतेसोबत जीवन जगतांना माणसं जोडण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती आपण पाहतो.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती यानुसार दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या स्वभावाची, गुण धर्माची माणसं असतात आणि या सर्वांसोबत कमी-अधिक प्रमाणात जुळवून घेत आपली काम करावी लागतात हे देखील तितकच सत्य. अंधारात चालतांना जशी प्रकाशाची गरज असते, उन्हात चालतांना जशी सावलीची गरज अपते तसं मानवी जीवनान प्रेमळ माणसांची गरज असते. जीवनात अशी प्रेमाची माणसं जोडणारी, त्यांच्यात मिसळून राहणारी, स्वकर्म आणि स्वकर्तृत्वाने मोठी झालेली तसच सुस्वभावी माणसं मात्र क्वचितचं. असचं एक उदार मनाचे आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणजे आकाशवाणी नांदेड केंद्राचे जेष्ठ प्रासंगिक उद्घोषक गौतम महादेव पट्टेबहादूर यांची आज जयंती. मुळ वाशिम जिल्ह्यातील केकतउमरा या गावचे हे कुटुंबीय. सर्वसाधारण आणि मध्यमवर्गीय कुटुंबात 27 ऑगस्ट 1971 मध्ये जन्मलेले देवयानी महादेव पट्टेबहादूर यांचे ते जेष्ठ पुत्र. वडील सरकारी कर्मचारी तर आई गृहिणी. वडिलांच्या नोकरी निमित्त त्यांचे कुटुंब नांदेड इथचं स्थायिक झाले.
त्यामुळे नांदेड इथचं नेहरू इंग्लीश मेडियम मध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण, मल्टीपर्पज हायस्कुल मध्ये माध्यमिक तर यशवंत महाविद्यालयान B.com पर्यंतचे शिक्षण झाले. तसचं त्यांनी विधी महाविद्यालयात प्रथम वर्षापर्यंतचे शिक्षण घेतल पण कांही कारणांमुळे त्याचं हे शिक्षण अपूर्णच राहिल. गौतम हे कुटुंबात सर्व भावडांमध्ये मोठे, पाच बहिणी आणि एक भाऊ अशा मोठ्या कुटुंबात ते वाढलेले. मानवी जीवन जगतांना बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व अशी जीवनाची विभागणी केली जाते. तसं पाहिल तर बालपण हे सर्वांचं अगदी आनंदी आनंदाचे. पण जस जसे मोठे होते जातो न तसं 'सरल ते बालपण अन् आले मोठेपण' यातील प्रचिती येते. मोठे होत गेल की भविष्याची चिंता लागते, स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी एक कसरत करावी लागते आणि हिच कसरत, धडपड करीत गौतम पट्टेबहादूर मोठे झाले. महाविद्यालयीन शिक्षणानंतर G.D.C& A. (Govt. Diploma in cooperation & Accountancy Board) म्हणजेच सहकार आणि लेखा शास्त्रातील सरकारी पद् विका' मिळवित त्यांनी 'लेखा परीक्षक' म्हणून नांदेड मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हे करीत असतांना 22 जून 1997 मध्ये त्यांच्यावर वैवाहिक जीवनाची एक नवीन जबाबदारी पडली. अमरावती जिल्हयातील शिराळा या गावातील रमा मारोतराव सिरसाट यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
त्यांना सिद्धांत आणि अनुष ही दोन मुलं आहेत. घरातील कुटुंबाची जबाबदारी आणि विवाहानंतरची जबाबदारी आणि विवाहानंतर ची जबाबदारी पार पाडीत त्यांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यांचा हा प्रवास म्हणावा तितका सोपाही नव्हता. त्यांना या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण या सर्वांवर न डगमगता मात करीत त्यांनी आपला पुढचा मार्ग सुकर केला. या सर्वात त्यांना कुटुंबाची आणि त्यांच्या पत्नीची मोलाची साथ मिळाली. 'एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्री चा हात असतो' न त्याचीच इथे अनुभूती आली. लिखान, वाचन, संगीत यांची आवड असल्यामुळे काही दिवस पत्रकार म्हणूनही त्यांनी काम केलं. इतकच नाही तर कोणत्याही कामाची लाज न बाळगता घरोघरी वृतपत्र टाकण्याचेही काम त्यांनी केले. एवढयावरच ते थांबले नाही, त्यांना रेडिओची असलेली आवड आणि त्यांचात असलेल्या आवाजाची निराळी कला त्यांना कांही स्वस्थ बसू देत नव्हती.
'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीद घेवून 29 मे 1991 रोजीचा दिवस नांदेड वासियांसाठी सविना सोनियाचा दिन ठरला. स्थानिक कलाकारांच्या कला गुणांना वाव देण्यापाठी LRS अर्थात स्थानिक रेडिओ स्टेशनची सुरुवात झाली. अशा या समाजाभिमुख प्रसार माध्यमात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विविध भाषण, संवादात्मक कार्यक्रमात सहभाग नोंदवित त्यांनी सूरू केला कधीही न संपणारा प्रवास. तत्कालीन कार्यक्रम अधिकाऱ्यानीही त्यांना ती सधी उपलब्ध करुन दिली. नंतर 1994 मध्ये अधिकृतरित्या प्रासंगिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली. मुळात त्यांच्यात असलेली रेडिओची आवड, विविध कार्यक्रमातील सहभाग आदींमुळे ते प्रसारमाध्यमात आणखीच रममाण झाले. एक प्रासंगिक उद्घोषक म्हणून काम करतांना विशेष म्हणजे आपल्या आवडीच्या माध्यमात काम करतांना संबंधीत अधिकारी, विविध श्रोतावर्ग, प्रतिष्ठित मान्यवर आदीसोबत त्यांचे ऋणानुबंध जुळत गेले. श्रोते हो नमस्कार.. Fm Band 101.1MHz वर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे अस म्हणत पाहता पाहता ते घराघरात पोहचले. फोन फरमाईश, थेट बांधावरून या सारख्या कार्यक्रमासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार मोलाचाचं. स्थानिकचे वास्तव्य असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना त्यांनी आकाशवाणीशी जोडल. किसानवाणी, आपली आवड,
आपकी पसंद, फोन फरमाईश, श्रोता संवाद, श्रोता मेळावे,विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती, प्रायोजीत कार्यक्रम, प्रत्यक्ष फोन वर आधारीत कार्यक्रम गुरु-ता-गद्दी काळातील प्रत्यक्ष धावत वर्णन, गणेश विसर्जन, निवडणुक निकालांचं प्रत्यक्ष धानत वर्णन, विविध जाहिराती आदीच्या माध्यमातून ते सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागले. अलीकडेचं 'तरंग' आणि 'रेडिओ सप्तरंग' या ॲपच्या संचालकपदाचे कार्य करीत आपल्या आवाजाच्या आणि दर्जेदार कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रोत्यां मध्ये एक वेगळी छवी निर्माण केली. त्यांच्या आवाजातील धीरगंभीरता, आवाजातले चढ-उतार, शब्दांची फेक आदी मुळे ते श्रोत्यांना कार्यक्रम संपेपर्यंत जखडून ठेवत. प्रत्येक व्यक्ती जशी जन्मत: चं वेगळी आणि विशेष असने न अगदी तशीच विशेषता त्यांच्यात असल्यामुळे ती त्यांना कायम इतरांपेक्षा वेगळ करते आणि हेच वेगळेपण त्यांना सिध्द करते.
आकाशवाणीच्या विविध कार्यक्रमान ते हिरीरीने सहभाग घेत आणि तो कार्यक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी ते प्रयत्नशील असत. एखाद्या वेळी कार्यक्रम वेळेत पूर्ण झाला नाही तर त्याची विभागणी करुन कार्यक्रमाचा दर्जा न ढासळू देता तो पूर्ण करीत. 'मैं देर करता नहीं देर हो जाती हैं', असं म्हणत आपल्यावर असलेली जबाबदारी ते सहज पूर्ण करीत. निरागस चेहरा, शांत, संयमी, सुसंस्कृत, सुस्वभावी, सर्वांची आपुलकीने विचारपुस करणारे, मुद्देसुद आणि अगदी कमी शब्दात पण परिणामकारक बोलणारे, मितभाषी, मनमिळाऊ, स्नेह आणि शब्द जपणारे, प्रत्येकाला समजून अन् ऐकुन घेणारे, सहकार्यवृती असलेले, अगदी साधी राहणीमान असलेले, खूप साध्या स्वभावाचे, अतिशय संवेदनशील, प्रगल्भ विचारशक्ती असणारे, मोहक व्यक्तीमत तसचं थोडे मिश्कील स्वभावाचे, विशेषत: स्मित हास्याची देणं लाभलेले, हे उत्तुंग व्यक्तीमत्व म्हणजे गौतमजी.. त्यांच्या या स्वभावामुळे येणारा सर्व अधिकारी वर्ग, सहकारी, श्रोते, मित्रमंडळी आदीसोबत त्यांचे संबंध अधिअधिक दृढ होत गेले हे विशेष. एक प्रासंगिक उद्घोषक म्हणून काम करताना यांना येणाऱ्या अडचणी, वेगवेगळ्या समस्या आदींच्या निराकरणासाठी त्यांच्याच पुढाकारातून 2017 मधे महाराष्ट्र स्तरावरील आकाशवाणी प्रासंगिक उद्घोषक आणि संकलक संघटना स्थापन करण्यात आली.आणि या संघटनेचेते अध्यक्ष होते.
प्रासंगिक उद्घोषक आणि संकलक यांच्या प्रगतीसाठी लढणारे ते लढवय्ये होते. संघटनेच्या माध्यमातून दिल्ली इथ झालेल्या आंदोलनात त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला तसच पुणे, औरंगाबाद इथ झालेल्या अधिवेशनातही त्यांनी सहभाग घेत संघटनेच्या कार्यात त्यांनी स्वत: ला झोकून दिले होते. खरतर एक कुटुंबवत्सल माणूस आणि तितकच जबाबदारही पण कोव्हिड-19 या महामारीच्या दुसऱ्या लाटेत त्यांचावर खूप मोठा आघात झाला. या कठिण काळात त्यांच्या कुटुंबातील वडिल, आई आणि बहिण या तिघांचे छत्र एका पाठोपाठ हरवले. याचा त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला. पण या कठिण प्रसंगातही त्यांनी मोठ्या हिंमतीने आणि न खाचता 'जिंदगी हर कदम एक नई जंग हैं' अस म्हणत मात केली. घरातील कुटुंबप्रमुखा प्रमाणे संघटनेच्या माध्यमातून सर्व उद्घोषक, संकलक यांची देखील कुटुंबप्रमुखाची जबाबदारी त्यांनी तितक्याचं आत्मविश्वासाने पार पाडली. त्यांच्या जीवनातील अनेक चढ-उतारांसोबत, विविध संकटाचा सामना करत आणि सर्व चिंता दूर सारून ते पुढे सरकत राहिले. सर्व प्रासंगीक उद्घोषक, संकलक यांना एकत्रित बांधून ठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्वांना एकत्रित घेवून त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात ते कधीच मागे राहिले नाही.
त्यांचे आचार, विचार हे नेहमीचं मार्गदर्शक आणि प्ररेक राहतील. लोकाभिमुख प्रसार माध्यमातील त्यांच्या 31 वर्षाच्या काळात त्यांनी स्वत: चे एक वेगळे स्थान निर्माण केले. असं म्हणतात, माणुस जन्माला येतो तेव्हा त्याला 'नाव' नसतं पण 'श्वास' असतो आणि ज्यावेळी तो मरतो तेव्हा त्याला 'नाव' असते पण 'श्वास' नसतो. या 'नाव' जाणि 'श्वास' यांतील अंतर म्हणजेच जीवन.. शून्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करीत त्यांनी आपल्या नावाचा कधीच न पुसला जाणारा ठसा सर्वांच्या मनावर उमटविला. आकाशवाणावरील कार्यक्रमाचा शेवट करतांना बरं आहे तर रसिक श्रोतेहो आजचा हा कार्यक्रम इथच संपवून मी गौतम पट्टेबहादूर आपला निरोप घेतोय.. जणु काही अशी उद्घोषणा देत त्यांनी आयुष्याच्या या जीवनपटातील 15 ऑगस्ट च्या सायंकाळी वयाच्या अवघ्या 51 व्या वर्षी अखरेचा निरोप घेतला. 'जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं' हे जीवनाचे सार सामावलेलं वाक्यचं जणू ते सांगून गेले. काळाने त्यांच्यावर घातलेली ही झडप सर्वांसाठी धक्कादायकच होती. त्यांच्याबद्दल काय आणि किती अन् कसं लिहाव हेच कळेना कारण त्यांना अस शब्दात व्यक्त म्हणा की बंदिस्त म्हणा ते तितकच कठिण. अगदी आपल्या गौतम या नावाप्रमाणचेच असलेले प्रभावशाली, धाडसी, जबाबदार तसच अंध:कार दूर करणारे, मनमिळाऊ, परोपकारी, सेवाभावीवृत्ती असलेले, निःस्वार्थी, जगण्याची कला शिकवणारे, सर्वांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन रुजविणारे, संघर्षशील, लढवय्ये नेतृत्व आम्हाला लाभल हे भाग्यच. त्यांनी दिलेली शिकवण, त्यांच्या विविध आठवणीच हे गाठोड कायम आमच्या सोबत राहील यात तिळमात्र शंका नाही. असामान्य, उदारमनाचे, करुणेचा सागर असलेले तसचं च स्वतःच्या आवाजाने शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची त्यांच्या आवाजातील अनामिक जादू ही कायम सर्वांच्या -हदयात अजरामर राहिल ही आजच्या दिनी मंगलकामना आणि हिचं आदरांजली..
.....संचिता अशोक केळकर, प्रासंगिक उद्घोषक, आकाशवाणी नांदेड केंद्र