दि. २५ ते २८ आगस्ट रोजी दरम्यान स्पर्धेत ११ राज्य सहभागी
नांदेड| जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई डॉ. केशवराव धोंडगे यांच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त शारिरिक शिक्षण महाविद्यालय पटांगण, कौठा येथे बी एस एफ आय सब ज्युनियर ( १५ वर्षाखालील) राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २५ ते २८ आगस्ट दरम्यान या स्पर्धा होता असुन उदघाटन दिनी दिल्ली- राजस्थान संघाने आपले खाते उघडत विजयी सलामी दिली आहे.
महाराष्ट्र बेसबॉल संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत १० राज्यातील जवळपास ३०० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दि. २५ आगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता बेसबॉल स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय सचीव मनोज कोहली, प्राचार्य डॉ. बळीराम लाड, फिदा हुसेन किदवी, सिनेट सदस्य अजय गायकवाड, कुलदीपसिंग जट, असलम खान, जुन दत्ता, राजकुमार, किशन चौधरी, विजय यादव, पिंटू कंधारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. राहुल वाघमारे यांनी केले. मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये झालेल्या स्पर्धेत दिल्ली व राजस्थान संघाने पहिल्या दिवशी झालेल्या स्पर्धेत बाजी मारली. दि. २८ आगस्ट रोजी बक्षीस वितरण संपन्न होईल. या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी डॉ. राहुल वाघमारे, दिगंबर शिंदे, विनोद जमदाडे, राहुल चंदेल, किरण नागरे, संतोष कांबळे, ग्यानोबा गिरडे, चाणक्य भोस्कर, वैजनाथ नावंदे, अशफाक सय्यद, शिवाजी जाधव, मोहम्मद कैफ, निलेश डोंगरे, संदीप कदम परीश्रम घेत आहेत. राष्ट्रीय पंचाची भुमिका जुन दत्ता, महेश सौदीया, शुभम यादव, मयुरी उच्चेसरे, राज सोनी, हिरकज्योत सोनवाल आदी करीत आहेत.