नांदेड| शहरातील मनपा प्रा.शाळा डॉ.आंबेडकरनगर येथे विद्यार्थ्यांना शिक्षण महिला व बालकल्याण समितीतर्फे मोफत सायकल वितरण नगरसेवक संदीप सोनकांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम मनपा शिक्षण महिला व बालकल्याण समिती सभापती अपर्णा नेरलकर,शिक्षण अधिकारी राजेश पातळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार 30 जुलै रोजी सकाळी 11 वा.मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम घेण्यात आले. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून यावेळी उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कै.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्ताने मनपा शाळेतील मुलींसाठी मोफत सायकल वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक संदीप सोनकांबळे,सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वडने,ज्येष्ठ श्यामराव वाघमारे, एन.एम.वाघमारे,कृष्णा गजभारे, पत्रकार मिलिंद दिवेकर, महेंद्र आठवले, सदाशिव गच्चे, मनपा शिक्षण विभागातील विषयतज्ज्ञ संदीप लबडे, गौतम कसबे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मनपा शाळेचे मुख्यध्यापक मारोती कांबळे यांनी सर्वांचे शाल,पुष्पहार देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. प्रस्तावना मारोती कांबळे यांनी शाळेतील विविध उपक्रम, समस्या यावर सविस्तर माहिती दिली.सत्काराला उत्तर देताना नगरसेवक संदीप सोनकांबळे यांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा विकासाचा दृष्टीकोन, सामान्य जनतेला न्याय, हक्क, समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे. शाळा आणि वार्ड विकास ध्येय वाढीसाठी सातत्य प्रयत्न करणार असून सायकल वाटप वितरण केल्याबद्दल मनपा सभापती, अधिकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते गंगाधर वडने यांनी शाळा, वार्ड यावर विचार व्यक्त केले. यानंतर विद्यार्थ्यांना सायकल वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्या आले. सदर कार्यक्रम यशस्वीते करिता सुजाता सुनेपवार, आशा घुले, व्हि.एस.भुताळे, डी.एन.कांबळे, राजू सोनकांबळे, सौ.संगिता सावंत, गौतम कांबळे यांच्यासह परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती होती. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुजाता सुनेपवार यांनी केले तर आभार आशा घुले यांनी मानले.