नविन नांदेड। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ जयंती सोहळा निमित्ताने २७ व २८ आगसष्ट रोजी प्रबोधन सभा, प्रबोधन जलसा,महारली व सभा ,शितल साठे यांच्या महा जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती सोहळा सिडको चा वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी २७ रोजी सकाळी ९ वाजता मनपाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण, दुपारी दोन बापुराव जमदाडे शिराढोणकर यांच्या प्रबोधन गिताचा कार्यक्रम, सायंकाळी सहा वाजता प्रबोधन सभा भाजपा नगरसेविका सौ बेबीताई गुपीले यांच्या अध्यक्षतेखाली व ऊद्वघाटक खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार असून या वेळी प्रमुख वक्ते डॉ.राजेशवर दुडकनाळे , व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
२८ रोजी सकाळी दहा वाजता महारली आयोजन सिडको परिसरातील मुख्य मार्गने करण्यात आले आहे तर ,४ वाजता प्रबोधन सभा ऊधोजक माधव डोमपले यांच्या अध्यक्षतेखाली यावेळी प्रमुख वक्ते दिपा कांबळे राऊतखेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत, यावेळी या सभेचे ऊद्वघाटक आ.अमर राजुरकर व आ.मोहनराव हंबर्डे हे करणार आहेत यावेळी परिसरातील लोक प्रतिनिधी व मान्यवरांच्यी उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ७ वाजता शितल साठे यांच्या महा जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या जयंती सोहळा निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष पपु गायकवाड, सचिव श्रीरंग खानजोडे , नितीन वाघमारे, मुन्ना कोलंबीकर, बाबुराव कांबळे, बालाजी बंसवते, शिवाजी वाघमारे,आंनदा वाघमारे, राजकुमार जांभळीकर, विठ्ठल घाटे, रणजित बाराहाळीकर, अवधुत आंबटवार, यशवंत गादेकर, बालाजी पाटोळे,विजय गायकवाड,प्रा.बालाजी गवारे व कार्याध्यक्ष निवृत्ती कांबळे व स्वागत अध्यक्ष दलीत मित्र नारायण कोंलबीकर यांनी केले आहे.
