नविन नांदेड। बैलपोळा सणांचा निमित्ताने नविन नांदेड भागातील अनेक ठिकाणी बैलजोडी विक्रीसाठी आणल्या नागरीक व शेतकरी यांनी बैलजोडी लागणा-या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ मध्ये गर्दी केली आहे.
सिडको हडको परिसरातील विविध भागात बैलपोळा सण २६ आगसष्ट रोजी असल्याने परिसरातील विविध ठिकाणी मुर्तीच्या दुकाने विक्री साठी लावण्यात आली आहेत, मुर्तीकार गोविंद लक्ष्मण चिलोरे धनेगावकर मुर्तीच्या व्यवसाय गेल्या अनेक वर्षांपासून,याही वर्षी कलर ,पिओपी, महागाई मुळे ही बैल जोडी व गाय सत्तर ते शंभर रुपये विक्री होत आहे,या वर्षी गोविंद लक्षमण चिलोरे,दता दुंधबे, राहुल गवारे, सुजित निलकंठे, बंटी नामंदिनवार , दिनेश भरकड, बालाजी कदम, राजेश कदम यांनी नांदेड, परभणी , हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणांचा विविध मुर्तीकाराने तयार केलेल्या आकर्षक अश्या बैलजोडी विक्रीसाठी आणल्या आहेत.
तर पोळा सणाच्या निमित्ताने शेतक-यांना बैलगाडी सजविण्यासाठी येणारे गोढे,कपाळ आरसा, कवडी गेज,वेसन,गोप मोरखी,कासरे, शेंदुर,पितळी गेज पट्टा, पाठिवरची झुल आदी साहित्य राजेश कदम यांच्या राजे महाराजे इलेक्ट्रॉनिक्स दुकान शिवाजी चौक सिडको येथे उपलब्ध केले असून शेतकऱ्यांनी या ठिकाणी व विविध भागात उपलब्ध असलेल्या दुकानातून खरेदी करणा-या साठी गर्दी केली आहे.
सिडको परिसरातील शिवाजी चौक भागात या बैल जोडी मुर्तीच्या विक्री करण्यासाठी अनेक दुकाने थाटली आहेत, करोना काळात दोन वर्षांत व्यवसाय ठप्प झाला असल्याचे सांगून यावर्षी बैल पोळा व गणपती मुळे व्यवसायाला चालना मिळेल असे सांगितले. पारंपरिक पोळा सणाच्या निमित्ताने ग्रामीण भागासह शहरी भागात मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने सिडको परिसरातील बाजारपेठ मध्ये गर्दी पाहवयास मिळाली आहे.
