शिवणी, प्रकाश कार्लेवाड। धार्मिक व सार्वजनिक उत्सवा प्रसंगी अतिउत्साहित न होता सामाजिक सलोख्याचे भान ठेवून सण साजरे करावे उत्साहाच्या भरात काही गैरकृत करून गुन्हा दाखल होण्याची नसती आफत ओढून घेऊ नका कायदा सुव्यवस्था व शिस्तीचे पालन करून सर्व समाजातील नागरिकांनी आगामी सण उत्सव शांततेत आणि आनंदात साजरे करावे असे' आवाहन इस्लापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रघुनाथ शेवाळे यांनी दि.२५ आगस्ट रोजी सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालय शिवणी येथील सरपंच सौ.लक्ष्मीबाई डुडूळे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी सण उत्सव च्या निमित्ताने आयोजीत केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत बोलताना म्हणाले.या वेळी प्रमुख उपस्थिती पोलीस पाटील प्रतिनिधी हन्मंतु बोंदरवाड,तंटामुक्ती अध्यक्ष बालगंगाराम भुशिवाड,मंदिर समिती अध्यक्ष हन्मंतु कटकेमोड,गंगाधर भुशिवाड, सह गावातील नागरिक उपस्थित होते.
सपोनि शेवाळे हे पुढे बोलताना म्हणाले की,गेली दोन ते आडीच वर्षे कोरोनामुळे सामाजिक व धार्मिक उत्सव साजरे करण्यावर निर्बंध आले होते. यंदा शासनाने निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.आगामी बैल पोळा,गणेश उत्सव,दुर्गा उत्सव, मोहरम, ईद,असे विविध सन व उत्सव साजरे करताना कार्यकर्त्यांनी कायदा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा असे म्हणाले,तर डीजे साऊंड सिस्टीम ला परवानगी मिळणार नाही याची प्रत्येक गणेश मंडळ व दुर्गा मंडळांनी नोंद घ्यावी,व तसेच डॉल्बी ऐवजी पारंपारिक वाद्याला मंडळांनी प्राध्यान्य द्यावे,गणेश मंडळाचा मंडप व विसर्जन मिरवणुकीतला देखावा हा रहदरीस अडथळा करणारा नसावा, ध्वनिक्षेपकाची मर्यादा पाळावी तसेच गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांनी पर्यावरण पूर्वक उपक्रम राबवावे या सोबत विशेष म्हणजे या दरम्यान तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे.
एकंदरीत सामाजिक सलोख्याचे भान ठेवून आगामी सण उत्सव साजरे करावे असे उपस्थित गावकरी मंडळी व विविध मंडळाच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. या वेळी पोलीस अमलदार बी.एस. काईतवाड, एस.एस.साखरे, ए.व्ही.माळवी, ग्रा.पं सदस्य दिगांबर बोंदरवाड,संग्राम बिरकुरे,शंकर भिसे,यादव आमले,रामचंद्र खंडेलवाड, गणेश पाटील,प्रसाद बोंदरवाड,बंडू गुंडुरे,बाबू मुद्दलवाड,महेश कोंडलवाड, रोशन पठाण,सुरेश जाधव, शिवम पडलवार,शिवाजी मेंढके,किशन जाधव आदी उपस्थित होते.बैठकीचे संचलन किशन वानोळे यांनी केले तर आभार पत्रकार प्रकाश कार्लेवाड यांनी मानले.यावेळी दिनेश अष्टपोलु,नडपी पबितोलू,आदींनी परिश्रम घेतले.